बिरसी विमानतळातील सुरक्षा रक्षकांचे साखळी धरणे आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST2021-01-20T04:29:20+5:302021-01-20T04:29:20+5:30
गोंदिया : बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणापासून आतापर्यंत स्थानिक नागरिक या प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवेला आता १३ ...

बिरसी विमानतळातील सुरक्षा रक्षकांचे साखळी धरणे आंदोलन ()
गोंदिया : बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणापासून आतापर्यंत स्थानिक नागरिक या प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवेला आता १३ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला. मात्र सुरक्षा रक्षकांची कोणतीही चूक नसताना विमानतळ प्रकल्पाने या सर्वांना अचानक कामावरून कमी केले. सुरक्षा रक्षकांना कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता त्यांना घरी बसवले आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून (दि.१९) सुरक्षा रक्षकांनी विमानतळासमोर धरणे साखळी आंदोलन सुरू केले आहे.
वर्ष २००७ मध्ये बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा परिसरातील स्थानिक नागरिकांना या प्रकल्पातील रोजगारात सामावून घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन विमानतळ तथा जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांना दिले होते. त्यानुसार परिसरातील युवकांना सुरक्षा रक्षक म्हणून कामावर घेण्यात आले त्यांच्या सेवेला आज तब्बल १३ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. अशात त्यांना कोणतीही सूचना न देता विमानतळ प्रकल्पाद्वारे कामावरून पूर्णत: कमी करण्यात आले. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या प्रकल्पात ९० टक्के एक्स-सर्व्हिस मॅन सुरक्षा रक्षक म्हणून असणे आवश्यक आहे. असे असतानाही वर्ष २००७ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने याची माहिती स्थानिक जनतेला का दिली नाही. आता डीजीआरचा उपयोग करीत सर्व सुरक्षा रक्षकांना कामावरून बंद केले आहे १९९४ पासून डीजीआर अस्तित्वात आहे तर मग २००७ ला या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना का म्हणून कामावर घेण्यात आले , असा प्रश्नही या सुरक्षा रक्षकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांना केवळ भूलथापा देण्यासाठी तर विमानतळ अधिकाऱ्यांनी माहिती दडवूण ठेवली अशी शंका उपस्थित होत आहेे. आम्हाला पुन्हा कामावर घ्या या मागणीसाठी विशाल सुरक्षा मजूर संघटनेचे अध्यक्ष अनिल भेंडारकर, सचिव पंकज वंजारी, उपाध्यक्ष बसंत मेश्राम, कार्यवाहक सतीश जगने, ऋषिमुनी पटले, लोकचंद मुंडेले, रामेश्वर चौधरी, गोविंद तावाडे, अनिल मंदरेले, मंगलेश मुंडेले, डिगंबर मेश्राम, सदाशिव पाथोडे यांनी आंदोलन सुरू केले आहे.