जैव विविधता मंडळाच्या चमूचे गोंदिया भ्रमण
By Admin | Updated: September 26, 2015 01:59 IST2015-09-26T01:59:52+5:302015-09-26T01:59:52+5:30
गुजरात जैव विविधता मंडळ तथा राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या जैव विविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त २० सदस्यांच्या ...

जैव विविधता मंडळाच्या चमूचे गोंदिया भ्रमण
गोंदिया : गुजरात जैव विविधता मंडळ तथा राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या जैव विविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त २० सदस्यांच्या चमूने महाराष्ट्र जैव विविधता मंडळाच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्याचे भ्रमण केले.
सुरूवातील सदर चमू गोरेगाव तालुक्यातील सोदलागोंदी व ग्रामपंचायत मुरदोली येथे पोहोचली. सदर चमू महाराष्ट्रात आपल्या सात दिवशीय भ्रमण दौऱ्यावर आहे. तसेच राज्यातील विविध भागात जैव विविधता संरक्षणाबाबत करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती घेत आहे.
ग्रामपंचायत मुरदोली येथे गोंदिया जिल्ह्याची प्रथम जैव विविधता व्यवस्थापन समिती भारतीय वन्यजीव न्यासच्या मार्गदर्शनात गठित करण्यात आली. तसेच डिसेंबर २०१४ मधील जिल्ह्याची प्रथम लोक जैवविविधता नोंदवही तयार करून महाराष्ट्र जैव विविधता मंडळास सोपविण्यात आले होते. ही नोंदवही तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, तांत्रिक सहायक आदींसह सदर चमूने चर्चा केली व नोंदवही तयार करण्याबाबत माहिती मिळवून घेतली. अतिथींचे स्वागत जैव विविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशेंद्र भगत, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल फरदे, क्षेत्राधिकारी जे.एस. जाधव, भारतीय वन्यजीव न्याचे प्रोजेक्ट लिडर अनिल नायर यांनी केले. भ्रमण दलचे नेतृत्व तांत्रिक सल्लागार डॉ.वेघडा यांनी केले.