‘अरे दिवानो’ वर सखींसोबत नाचले बिग बी
By Admin | Updated: March 13, 2016 02:05 IST2016-03-13T02:05:56+5:302016-03-13T02:05:56+5:30
सिनेसृष्टीतील महानायकाला भेटण्याची इच्छा प्रत्येकाला असते. गोंदियातीलही जनता यापासून दूर कशी राहणार?

‘अरे दिवानो’ वर सखींसोबत नाचले बिग बी
विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान : जिल्हाधिकारी खेळले कौन बनेगा करोडपती; सखी मंचच्या ‘मै अभिताभ बच्चन बोल रहा हूं’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
गोंदिया : सिनेसृष्टीतील महानायकाला भेटण्याची इच्छा प्रत्येकाला असते. गोंदियातीलही जनता यापासून दूर कशी राहणार? या गोंदियातील जनतेशी बिग बीने प्रत्येक्षात हस्तांदोलन करावे अशी संधी लोकमत सखीमंचच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. ज्युनियर अमिताभ बच्चन यांनी गोंदियातील सखींशी विविध गाण्याच्या तालावर नृत्य सादर करीत त्यांनी गोंदियातील जनतेचे मनोरंजन केले.
औचित्य होते लोकमत सखीमंचच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे. लोकमत सखीमंच व महिला अर्बन को आॅपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जैन कुशल भवन गोंदिया येथे आयोजित जिल्हा स्तरीय सखी गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या महिलांचा ज्युनियर अभिताभ बच्चन, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, जिल्हा शल्यचिकीत्स डॉ. रवि धकाते, महिला अर्बन को आॅपरेटीव्ह बँकच्या अध्यक्षा डॉ, माधुरी नासरे, उपाध्यक्ष प्रिया रहांगडाले, लोकमतचे उपासंपादक नरेश रहिले, लोकमत समाचाराचे मुकेशकुमार शर्मा, नागपूर येथील लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा व लोकमत सखीमंचच्या संस्थापिका स्व. जोत्सना दर्डा यांच्या तैलचित्राचे पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ज्युनियर अभिताभ बच्चन च्या भूमिकेत असलेल्या खानदेशातील शशीकांत पेडवाल यांनी सभागृहात एन्ट्री करतांना अरे दिवानो मुझे पहचानो, कहाँ से आया, मै हू कोण, मै हू कोण, मै हू कोण या गीताला गात रसीकांची मने जिंकली. यावेळी ज्युनियर अभिताभ बच्चन यांनी यांनी उपस्थित महिलांना मंचावर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. महिलांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे महिलांनी दिल्यामुळे त्यांनाही बक्षीस जिंकले. मै ओर मेरी तनहाई हे डायलॉग अत्यंत प्रभावी ठरली. हरिवंश रॉय यांच्या कवीता सादर केल्या. डॉन का इतंजार तो ग्यारह मूल्क की पुलीस कर रही है, डॉन को पकडना मुश्कील नही तो नामुमकीन है, रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है शहंशाह असे विविध डायलॉग मारले. पार्टी तो बनती है या गाण्यावर सर्व महिला बेधुंद नाचल्या. महिलांसोबत विविध खेळ खेळले. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिलांना चांदीचे नाणे व इतर भरपूर बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात धुंद झालेल्या महिलांनी आनंद लुटला. वातावरण उत्साहीत झाले होते. या कार्यक्रमाला हजार महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर येथील संयोजिका नेहा जोशी, संचालन जिल्हा संयोजिका दिव्या भगत तर आभार जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी रामभरोस चक्रवर्ती, शालिनी पटले, सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी भावना कदम, सिमा बैतुले, योजना कोतवाल, योगीनी पत्थे, मीना डुंबरे, सविता तुरकर, यशोधरा सोनवाने, भारती तिडके, पद्मीनी उके, मंदा राऊत, हिमेश्वरी कावळे, प्रज्ञा मेहता, वैशाली कोटेवार, वर्षा भांडारकर, संतोष बिलोने, ऋषी कावळे, दर्पन वानखेडे, हर्षा राऊत, सिमा डोये, रेखा देशमुख यांच्यासह अनेक सखींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
मान्यवर पाहुण्यांचे मनोगत
सामाजिक क्रांती घडविणारा लोकमत : जिल्हाधिकारी सूर्यवंशी
लोकमत तळागाळातील लोकांचा उत्थान करण्यासाठी प्रयत्न करतो. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविण्यात आघाडीवर असतो. गोंदियात कुठल्याही कार्यक्रमाला मी गेलो आणि शंभराच्या वर माणसे असली तर मी त्यांना स्वच्छतेसंदर्भात सांगतोे, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले. विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार लोकमतने कलेला त्याबद्दल लोकमतची प्रशंशा केली. स्वच्छता सफलतेची पायरी असल्याचे सांगत त्यांनी मिसकॉलची गंमतही सांगितली.
येथील कलाकारांचे सशक्तीकरण व्हावे : रामदास राठोड
गोंदियात अभिनय खूप आहे. त्या अभिनयाचे शसक्तीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करायला हवे. मी माझ्या कॅरीअरची सुरूवात लोकमत या वृत्तपत्रातून केली आहे. आता मी पोलीस अधिकारी असलो तरू मूळ पत्रकारितेचे आहे, असे गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड म्हणाले.
लिंगभेद डोक्यातून काढून टाका : धकाते
महिलाच महिलांची शत्रू आहे. आपण एकिकडे महिलांचा सन्मान करतो मात्र दुसरीकडे सासू या महिलेला नातू हव असत. त्यातूनच लिंगभेदाची सुरूवात होत असते. ही संकुचित संकल्पना बाहेर सारा असे म्हणत लोकमच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रवी धकाते यांनी केले.
महिलांनी सशक्त व्हावे : माधुरी नासरे
महिला प्रत्येक क्षेत्रात झेप घेत आहेत. आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात भरारी घेण्यास महिला सजग आहे. तरीही अनेक महिला ह्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. त्यासाठी महिलांनी सशक्त व्हावे असे आवाहन महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे यांनी केले.