बोदलकसा पर्यटनस्थळी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:17 IST2016-09-28T01:17:41+5:302016-09-28T01:17:41+5:30

पर्यटन स्थळ विकास योजना अंतर्गत बोदलकसा येथे बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

Bhumipujan of Badalkasya tourist road construction | बोदलकसा पर्यटनस्थळी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

बोदलकसा पर्यटनस्थळी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

तिरोडा : पर्यटन स्थळ विकास योजना अंतर्गत बोदलकसा येथे बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बांधकाम आठ लाख २९ हजार रूपये खर्चाचे आहे.
याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी सांगितले, पर्यटन स्थळ विकास योजनेतून क्षेत्रामध्ये पर्यटन स्थळ विकसित व्हावे व पर्यटनाला वाव मिळावे. तसेच बोदलकसा, चोरखमारा व केरझरा हे पर्यटनस्थळ नागझिरा अभयारण्याला लागून असून या पर्यटनस्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. चोरखमारा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाकडे १४ कोटी रूपये व केरझरा पर्यटनाच्या विकासाकरिता सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जर या पर्यटन स्थळांचा विकास झाला तर पर्यटनाला वाव मिळेल व बाहेरील पर्यटकांची गर्दी वाढून येथील स्थानिक बेरोजगारांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करणे सुरू आहे, असे आ. रहांगडाले यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी माजी आ. भजनदास वैद्य, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, रमणीक सयाम, पवन पटले, माया रहांगडाले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, भाजप शहर अध्यक्ष सलाम शेख, कृऊबासचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, सरपंच प्रभा जांभुळकर, डॉ. दिलीप कोठीकर, डॉ. नन्हासिंग पटले, तालुका महामंत्री पिंटू रहांगडाले, मिलिंद कुंभरे, नीरज सोनेवाने, गणेश बघेले, निलेश बावनथडे, भुमेश्वर रहांगडाले, स्वानंद पारधी, कैलाश कटरे, सुधिर येळे तसेच गावकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bhumipujan of Badalkasya tourist road construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.