ग्राम सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:24 IST2018-04-24T23:24:03+5:302018-04-24T23:24:03+5:30
गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले.

ग्राम सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले. कटंगी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमिद अकबर अली यांच्या अध्यक्षतेत, आ. विजय रहांगडाले यांनी पूजन करून व कुदळ मारुन भूमिपूजन केले. या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती दोनोडे, जिल्हा परिषद सदस्य पी.जी. कटरे, सदस्य ललीता चौरागडे, भाजपा महामंत्री संजय बारेवार, साहेबलाल कटरे, सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, उपसरपंच प्रेमलाल भगत, ग्रा.पं. सदस्य, केवल बिसेन, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, अनूप कटरे उपस्थित होते.
याप्रसंगी आ. विजय रहांगडाले यांनी शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली.
प्रधानमंत्री सडक योजनेच्या आधारावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेबाबत माहिती सांगितली. गावकऱ्यांनी लक्ष देऊन काम चांगले व वर्षानुवर्षे टिकावू व्हावे याची दक्षता घ्यावी, असेही आ. विजय रहांगडाले म्हणाले.