तिरोड्यातील शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

By Admin | Updated: February 7, 2016 02:37 IST2016-02-07T02:37:26+5:302016-02-07T02:37:26+5:30

स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन व तिरोडा नगर परिषदद्वारे निर्मित नवीन सभापती कक्षाचे लोकार्पण खा. प्रफुल पटेल यांचे हस्ते करण्यात आले.

Bhumi Pujan of Shingada lake culture in Tirod | तिरोड्यातील शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

तिरोड्यातील शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

तिरोडा : स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन व तिरोडा नगर परिषदद्वारे निर्मित नवीन सभापती कक्षाचे लोकार्पण खा. प्रफुल पटेल यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आ.राजेंद्र जैन, न.प. अध्यक्ष अजय गौर, उपाध्यक्षा ममता बैस, डॉ. अविनाश जायस्वाल, माजी आ. दिलीप बंसोड, जि.प. सदस्या राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सभापती उषा किंदरले, माजी नगराध्यक्ष नरेश कुंभारे उपस्थित होते.
यावेळी खा. पटेल म्हणाले की, तिरोडा शहरात १०० टक्के घरकुल झाले आहे. अदानी प्लांटमुळेधापेवाडा बॅरेजवर पाणी भरलेला आहे. वाटपाची व्यवस्था करा, धानाचे भाव २८०० वरून १८०० रु. वर आहेत. कुठे गेले शेतकऱ्यांचे कैवारी, नुसते भूमिपूजन करून चालणार नाही उद्घाटनही झाले पाहिजे. कामे झाली पाहिजे असे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून नगराध्यक्ष गौर यांनी ७.३३ कोटी रुपयाच्या सौंदर्यीकरणात कशाचा समावेश असेल यावर सविस्तर माहिती दिली. आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. संचालन संदीप खणंग तर आभार मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी न.प.सभापती ओमप्रकाश येरपुडे, अर्चनादेवी जायस्वाल, जोसना शेंडे, माजी अध्यक्षा राखी गुणेरिया, सदस्या देवका उरकुडे, शाहीन मिर्झा, छाया कटरे, ममता हट्टेवार, राजश्री उपवंशी, विजय बन्सोड, सलीम जव्हेरी, अशोक असाटी, नरेश धुर्वे, प्रशांत डहाटे, जिब्राईल खा पठान, रामकुमार असाटी, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Bhumi Pujan of Shingada lake culture in Tirod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.