कोचेवाही व सावरी येथील विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:44 IST2018-03-11T00:44:00+5:302018-03-11T00:44:00+5:30

तालुक्यातील ग्राम कोचेवाही येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण तसेच ग्राम सावरी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता सिमेंटीकरणाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

Bhumi Pujan of the development works of Kochevahi and Sawari | कोचेवाही व सावरी येथील विकासकामांचे भूमिपूजन

कोचेवाही व सावरी येथील विकासकामांचे भूमिपूजन

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : तालुक्यातील ग्राम कोचेवाही येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण तसेच ग्राम सावरी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता सिमेंटीकरणाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या वचनाची पुर्र्तता करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील नागरिकांची अडचण आपली व्यक्तीगत अडचण समजून दूर करण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, चमन बिसेन, विजय लोणारे, कमलेश्वरी लिल्हारे, प्रकाश डहाट, रमेश लिल्हारे, डिलेश्वरी पटले, नरेंद्रसिंग चिखलोंडे, चिंतामन चौधरी, गेंदलाल शरणागत, वाय.पी.रहांगडाले, लिलावंती चिखलोंडे, टेकचंद सिहारे, ईश्वर पटले, गौरीशंकर डहाट, देवकनबाई बिसेन, अनिता पटले, सिताराम दमाहे, आशा कुंभरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of the development works of Kochevahi and Sawari