रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:10 IST2017-12-21T22:09:15+5:302017-12-21T22:10:08+5:30

तालुक्यातील ग्राम बनाथर येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

Bhaumibhujan of road construction | रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

ठळक मुद्देआमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम बनाथर येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी जो काम करतो त्याचे नाव कुणीही मिटवू शकत नाही. आम्ही नेहमी क्षेत्रातील नागरिकांच्या हितार्थ काम केले असून यामुळेच आज डोकं वर करून लोकांपुढे उभे राहतो. आम्ही श्रेय लाटण्यासाठी नाही तर आपल्या लोकांसाठी कामे करतो. यात श्रेय कुणालाही मिळो, फक्त माझ्या लोकांचे काम व्हावे असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले
याप्रसंगी देवेंद्र मानकर, लोकचंद दंदरे, सत्यम बहेकार, राजेश माने, मेहताब पाचे, अशोक बर्वे, आशिष चव्हाण, प्रदीपसिंह चव्हाण, पवन तेलासे, सुखदेव बिसेन, राजकुमार खरे, मेहतर तेलासे, सुरेंद्र चव्हाण, हरूलाल अडमे, प्रवेश अवस्थी, सुमन कछवाह, भागवंती माने, कमलेश मरठे, श्रवण पाचे, सुशिल पाचे, भास्कर नागदिवे, मिलकीराम उलके, झाडूलाल माने, रामेश्वर बिसेन, सितुलाल माने, रामनाथ बारापात्रे, दीपक दिवेवार, फागूलाल नागफासे, मार्कंड मेश्राम व अन्य उपस्थित होते.

Web Title: Bhaumibhujan of road construction