भरतची आत्महत्या नसून हत्याच, गावकऱ्यांचा संशय

By Admin | Updated: November 4, 2014 22:42 IST2014-11-04T22:42:08+5:302014-11-04T22:42:08+5:30

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या

Bharat's suicide is not suicide, villagers doubt | भरतची आत्महत्या नसून हत्याच, गावकऱ्यांचा संशय

भरतची आत्महत्या नसून हत्याच, गावकऱ्यांचा संशय

परसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांची हत्याच करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. त्यामुळे परिसरात बुधवारी तणावपूर्ण वातावरण होते.
मृत भरत बसोने हे गावोगावी जाऊन हातठेल्यावर रेडीमेड कपडे विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे भरतची परिसरात सर्वत्र ओळख होती. घटनास्थळ आणि त्यांच्या घराचे अंतर साडेतीन किमी असून भरत त्या ठिकाणी गेला कसा असा संशय गावकरी व्यक्त करीत आहेत. दि. २ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता भरत घरी होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो मुरदाडा बाजार चौकात लोकांना दिसला. रात्री भरत घरी पोहोचलाच नाही व घरच्यांनीही भरतचा शोध घेतला नाही.
सकाळी आजुबाजुच्या मोहल्ल्यातील महिलांनी मृतकाच्या पत्नीला विचारले असता तिने माझ्या भावाला माहिती आहे असे सांगितले. मृत भरत मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याची पहिली पत्नी मुरदाडा येथील असल्याने तो सासरीच १५ वर्षापासून वास्तव्य करून राहात होता.
पहिल्या पत्नीपासून एक विशाल नावाचा मुलगा आहे. १० वर्षानंतर पहिली पत्नी मरण पावल्याने दुसरे लग्न केले. कारंजा येथील गिरजासोबत लग्न झाले. गिरजाचेही हे दुसरे लग्न आहे. गिरजाशी मात्र त्याचे नेहमी भांडण होत असे. गावातील भरतच्या वाट्याची अडीच एकर जमीन विक्री करून पैसे आण यासाठी तिचे भांडण होत असे.
भरतच्या हत्येमागे घरातील भांडण हेच कारण असावे अशी शंका गावकऱ्यांना येत आहे. भरतने आत्महत्या केलाचा देखावा करण्यात आला, मात्र ही हत्याच असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. भरतचे भाऊ मुलसिंह बसोने यांनीही भरत फोनवर बोलत होता तेव्हा पत्नी जमीन विक्री करण्यासाठी भांडण करीत असल्याचे सांगत असल्याचे सांगितले.
मोहल्ल्यातील १० वर्षे वयाच्या तीन मुलांनी गिरजाच्या भावाने सकाळी १० वाजता येऊन घरून पैसे नेल्याचे सांगितले. चिठ्ठीही आढळली, पण त्यात काही लिहीले आहे हे कळल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाही अशी भूमिका गावातील नागरिक व पहिल्या पत्नीच्या भावाने घेतली होती. त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती होती. मोहल्ल्यातील काही नागरिक व महिलांनीही बयान दिले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पो.उपनिरीक्षक सावंत करीत आहे. सत्य समोर येईलच असे सावंत यांनी सांगितले. सोबत गंगाझरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील हे ही तपास करीत आहे. घरातील मोबाईलही जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यातील खऱ्या आरोपींना दोन दिवसात गजाआड करणार असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bharat's suicide is not suicide, villagers doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.