भजेपार चषक खेळाडू निर्मितीची फॅक्टरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:22 AM2019-01-05T00:22:51+5:302019-01-05T00:24:22+5:30

सालेकसा तालुक्यातील भजेपारसारख्या गावात स्वदेशी खेळ कबड्डी खेळाला अतिशय प्रभावीपणे सादर करण्यासाठी भजेपारवासीयांचे कौतुक करावस वाटते. कबड्डी हा मैदानी खेळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे महत्व वाढत आहे.

Bhajeparti Trophy Player Producer Factory | भजेपार चषक खेळाडू निर्मितीची फॅक्टरी

भजेपार चषक खेळाडू निर्मितीची फॅक्टरी

Next
ठळक मुद्देनाना पटोले : आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील भजेपारसारख्या गावात स्वदेशी खेळ कबड्डी खेळाला अतिशय प्रभावीपणे सादर करण्यासाठी भजेपारवासीयांचे कौतुक करावस वाटते. कबड्डी हा मैदानी खेळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे महत्व वाढत आहे. भजेपार वासीयांनी व्यापक स्वरुपात खेळाचे आयोजन केल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे एक प्रकारे भजेपारला कबड्डी खेळाडूंची फॅक्टरी म्हटल्यास वावगे ठरू नये, असे विचार अखिल भारतीय काँग्रेस खेत मजूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.
सूर्योदय क्रीडा मंडळ,नवयुवक कबड्डी क्लब व ग्रामपंचायत भजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने भजेपार येथे आंतरराष्ट्रीयय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.४) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. सहउद्घाटक माजी आ. रामरतन राऊत, दीप प्रज्वलक महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, भाजपा सालेकसा तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, सरपंच सखाराम राऊत, कारूटोलाचे उपसरपंच नंदकिशोर चुटे, उपसरपंच कैलास बहेकार, सिने कलावंत गणेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. सर्वप्रथम बजरंग बली, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. सर्व प्रथम गणपती वंदना करण्यात आली. स्पर्धेदरम्यान विष्णू पाथोडे यांचा सत्कार करण्यात आला. पटोले म्हणाले, ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू असून त्यांना पुढे येण्यासाठी योग्य मंच आणि मार्गदर्शनाची गरज आहे. भजेपार चषकाच्या आयोजनामुळे खऱ्या अर्थाने हे काम शक्य होत असल्याचे सांगितले. पुराम यांनी सद्यस्थितीत शासनातर्फे शेतकºयांच्या हितासाठी ज़्या योजना राबविल्या जात आहेत त्यासंबंधी माहिती दिली. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रमसुला चुटे तर प्रास्ताविक चंद्रकुमार बहेकार यांनी केले.

Web Title: Bhajeparti Trophy Player Producer Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.