रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन
By Admin | Updated: May 20, 2015 01:37 IST2015-05-20T01:37:02+5:302015-05-20T01:37:02+5:30
बोंडगावदेवी जि.प. प्रभागातील दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्ता डांबरीकरण बांधकामाचे भूमिपूजन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन
बोंडगावदेवी : बोंडगावदेवी जि.प. प्रभागातील दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्ता डांबरीकरण बांधकामाचे भूमिपूजन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दाभना ते अर्जुनी-मोरगाव या दोन किमी रस्त्याचे नुतनीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १७.५० लाखांचा निधी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या प्रयत्नाने प्राप्त झाला. सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी प्राप्त झाल्याने जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा करून भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी दाभना ग्रामपंचायतचे सरपंच प्रभुदास प्रधान, डोमा राखडे, मालता प्रधान, दामोधर ब्राह्मणकर, चोपराम डोये, हरिश्चंद्र घासले, कैलाश भेंडारकर, पाडुरंग शहारे, श्यामराव गभणे, वासुदेव शहारे, विलास गभणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्त्याच्या नुतनीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. (वार्ताहर)