गोल्डन धमाका २०१७ ची भाग्यवंत सोडत
By Admin | Updated: June 17, 2017 00:26 IST2017-06-17T00:26:52+5:302017-06-17T00:26:52+5:30
लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्तवतीने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान

गोल्डन धमाका २०१७ ची भाग्यवंत सोडत
नागपूरच्या साधना ठाकरे यांना मिळाले ५१,००० रु. चे दागिने
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्तवतीने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान राबविलेल्या गोल्डन धमाका या योजनेची सोडत ९ जून १७ रोजी अभिनेत्री किशोरी शहाणे आणि या योजनेचे प्रायोजक राजेश रोकडे यांच्या हस्ते काढण्यात आली. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ५ जिल्ह्यांमधून आलेल्या प्रवेशिकांमधून ही भाग्यवंत सोडत काढण्यात आली.
विजेत्यांचे पुरस्कार वितरण रोकडे ज्वेलर्स, बडकस चौक येथे करण्यात येणार आहे. प्रथम ५१ हजार रूपये, द्वितीय २१ हजार रूपये, तृतीय ११ हजार रूपयांचे २ बक्षिसे, चतुर्थ ७ हजार रूपयांचे ३ बक्षिसे व पाचवे ५ हजार रूपयांचे ३ बक्षिसे आणि उत्तेजनार्थ १०१ बक्षिसे रोकडे ज्वेलर्स यांचेकडून देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी लोकमत कार्यालयात श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांच्याशी संपर्क साधता येईल.
गोल्डन धमाका स्पर्धेतील विजेते स्पर्धक
प्रथम-साधना ठाकरे, नागपूर (५१,०००), द्वितीय- रोहिणी गोडशेडवार, चंद्रपूर (मूल) (२१,०००), तृतीय- (१) पुष्पा डहाके, भंडारा (११,०००), (२) विद्या बारसकर (आष्टी), गडचिरोली, चतुर्थ- (१) मनिषा पखाले, नागपूर (७०००), (२) आरजू हाडगे, गडचिरोली , (३) सरोज उके, गोंदिया, पाचवे- (१) अर्चना शनिवारे, नागपूर (५०००), (२) नलिनी पाखमोडे, भंडारा (लाखनी, मुरमाडी), (३) सोनाली धनमने, चंद्रपूर