शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

पीएम किसान योजनेचे लाभार्थी आले अर्ध्यावर; जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकरी वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:41 IST

सर्वेक्षण मोहिमेचा परिणाम : १ लाख ९ हजार १६४ शेतकऱ्यांना मिळाला १७ वा हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात एकूण २ लाख ७६ हजार खातेदार शेतकरी आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. जेव्हा ही योजना लागू करण्यात आली, तेव्हा या योजनेचे २ लाख २० हजारांवर लाभार्थी होते, पण या योजनेचा लाभ पात्र नसलेले शेतकरीसुद्धा घेत होते. त्यामुळे महसूल विभागाने योग्य पात्र लाभार्थी शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळावा यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविली. त्यात जवळपास १ लाख १० हजारांवर शेतकरी वगळले गेले असून लाभार्थी अर्ध्यावर आले आहेत.

पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ केवळ १ लाख ९ हजार १६४ शेतकऱ्यांना मिळाला आहे. ही आकडेवारी कृषी विभागाची आहे. विशेष म्हणजे या योजनेचा १८ वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून तो लवकरच जमा होणार आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेसुद्धा शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. 

दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे, पण या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील सात-बारावर नावे असलेले तीन-चार व्यक्ती घेत होते, तर आयकर भरणारे, पती-पत्नी हेसुद्धा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जवळपास १ लाख १० हजारांवर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे चित्र आहे, तर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून उचल केलेल्या हप्त्यांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रियासुद्धा सुर करण्यात आली आहे. आतापर्यंत २९३४ शेतकऱ्यांकडून दीड कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती आहे. 

अनेक शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जुळेनामहसूल विभागाने पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले असता त्यात अनेक शेतकऱ्यांचे सात-बारावरील खाते क्रमांक जुळत नव्हते, तर काही शेतकऱ्यांचे रहिवासी पत्ते, काही मृतक शेतकऱ्यांच्या नावावरसुद्धा अनुदान जमा केले जात असल्याचे आढळले. त्यामुळे ही सर्व नावे वगळल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे.

१७ व्या हप्त्याची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या तालुका                          शेतकरी संख्याआमगाव                              १३७०५ अर्जुनी मोरगाव                      १३११८ गोंदिया                                २०२०४ गोरेगाव                                ११९४४ सडक अर्जुनी                        १२९०८ सालेकसा                              ९२२५ तिरोडा                                 १८५५६ एकूण                                  १०९१६४

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र