दायींना मिळतात फक्त २०० रूपये
By Admin | Updated: April 2, 2016 02:23 IST2016-04-02T02:23:54+5:302016-04-02T02:23:54+5:30
वाढत्या माता मृत्यू व बालमृत्यूवर आळा घालण्यासाठी शासनाद्वारे आरोग्य संस्थेतच प्रसूतीसाठी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मक परिणाम समोर आले.

दायींना मिळतात फक्त २०० रूपये
२९ टक्के बैठकांना दांडी : बैठकीच्या उपस्थितीसाठी अवघे ५० रूपये
गोंदिया : वाढत्या माता मृत्यू व बालमृत्यूवर आळा घालण्यासाठी शासनाद्वारे आरोग्य संस्थेतच प्रसूतीसाठी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मक परिणाम समोर आले. संस्थेत वाढणारी प्रसूतीमुळे घरी प्रसूती करणाऱ्या दायी यांच्या समोर रोजगाराची समस्या उत्पन्न झाली आहे. दायींना प्रत्येक बैठकीवर ४० रूपये व १० रूपये इतर खर्चासाठी देण्यात येते. दायी वर शासनाकडून वर्षाकाठी फक्त २०० रूपये देण्यात येत असल्याने अत्यल्प मानधनामुळे दायींनी बैठकांना दांडी मारण्याचे काम सुरू केले आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी क्षेत्रात ४५२ दायी कार्यरत आहेत. प्रसूती झालेल्यजा महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या दायिंना सेवा नवसंजीवनी योजना अंतर्गत मानधन दग्ेण्यात येते. परंतु हा मानधन अत्यंत कमी आहे.त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या बैठकांकडे दायिंनी पाठ फिरवली आहे.
आदिवासी क्षेत्रात माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट आणण्यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यातील ८ हजार ४१९ गावात नवसंजीवणी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी, एक गैर वैद्यकीय कर्मचारी व एक वाहन १७२ फिरते पथक तयार करण्यात आले. सदर पथक सर्व गाव व वाड्यांना भेट देऊन कुपोषीत व आजारी बालकांचा शोध सुरू आहे. घरी प्रसूती करणाऱ्या महिलांना शागधण्याचे काम केले जाते. या योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ८९ उपकेंद्राचा समावेश आहे.
माता मृत्यू दर व बाल मृत्यू दरात घट यावी यासाठी मातृत्व अनुदान, दाई बैठक, पावसाळ्यापूर्वी उपाय योजना, आहार व बुडीत मजूरी या योजनांचा लाभ देण्यात येतो. आदिवासी क्षेत्रातील गर्भवती महिलांची नोंदणी, नियमित आरोग्य तपासणी व आवश्यक औषधी पुरवठ्यासाठी नवसंजीवनी योजनेंतर्गत मातृत्व अनुदान योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रसूती पूर्व आरोग्य तपासणीसाठी केंद्राना भेट देणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला ४०० रूपयाची औषधी उपलब्ध करून दिली जाते. (तालुका प्रतिनिधी)
४०२ पैकी २८७ बैठक घेतल्या
जिल्ह्यात ४५२ दायी कार्यरत आहेत. सन२०१४-१५ मध्ये ३३० दायेंच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले. या बैठकांना १७११ दायींची उपस्थित होती. सन २०१५-१६ च्या मार्च अखेरपर्यनत ४०२ बैठका अपेक्षित होत्या. मात्र २८७ बैठका फेब्रुवारी पर्यंत २८७ बैठका झाल्या आहेत. या बैठकांची १३२२ बैठकांची उपस्थिती दाखविण्यात आली आहे.तर ४८६ दायींची अनुपस्थिती राहीली.
निधी खर्च झालाच नाही
सन २०१४-१५ मध्ये या योजनेंतर्गत जि.प. आरोग्य विभागाला एक लाख रूपयाचे अनुदान देण्यात येते. यात मार्च २०१५ अखेरपर्यंत ९१ हजार रूपये खर्च झाले. या वर्षी ४५२ दायींसाठी २०० रूपये हिशेबाने एक लाख रूपये अनुदान देण्यात आला. परंतु ५७ हजार ४०० रूपये खर्च झाले आहेत.
दायींना आरोग्य प्रशिक्षण
घरी प्रसूती होणार यासाठी दायी आधी सज्ज असायच्या. मात्र आता दायी माता व बालकांची आरोम्यसंबधी काळजी घेण्यात येते. दायी बैठक योजना अंतर्गत सुरक्षित प्रसूती व बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टिने उपकेंद्रात प्रशिक्षित व अप्रशिक्षित दायी ची त्रैमासिक बैठक घऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते. बैठकीत नवजात बाळाची सुरक्षा, टीकाकरण, स्तनपानाचे महत्व, मातेचा आहार व माता च्या हाताचे नखांची स्वच्छता यावर मार्गदर्शन केले जाते.