ईको डेव्हलपमेंटचे लाभार्थी गॅस सबसिडीपासून वंचित

By Admin | Updated: July 20, 2015 01:31 IST2015-07-20T01:31:20+5:302015-07-20T01:31:20+5:30

चौकशीची मागणी : सहायक वनसंरक्षकाना तक्रार, पदाधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

Beneficiaries of Eco Development are deprived of gas subsidy | ईको डेव्हलपमेंटचे लाभार्थी गॅस सबसिडीपासून वंचित

ईको डेव्हलपमेंटचे लाभार्थी गॅस सबसिडीपासून वंचित

साकोली : तालुक्यातील उमरझरी, शिवनटोला या गावात ईको डेव्हलपमेंट कमेटीतर्फे वाटप करण्यात आलेल्या गॅस लाभार्थ्यांना तीन वर्षांपासून सबसिडी मिळालीच नाही. तरी तात्काळ देण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी सहाय्यक वनसंरक्षक नवीन नागझीरा वन्यजीव अभयारण्य उमरझरी यांना निवेदन दिले आहे.
ईको डेव्हल्पमेंट कमेटीमार्फत उमरझरी, शिवणटोला या गावात एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मात्र मागील एक वर्षापासून गॅसची सबसिडी मिळाली नाही. तसेच ईडीसीचे अध्यक्ष व सचिव यांनी तलाव खोलीकरणाचे कामे केली असता. ईडीसी सदस्यांना व गावकऱ्यांना कामाचा हिशोब सादर केला नाही व यासंदर्भात अध्यक्ष व सचिव यांच्याशी चर्चा केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे ईडीसीचे अध्यक्ष व सचिव बदलविण्यात यावे, तसेच हंगामी मजूर रोटेशन पध्दतीने तीन तीन महिन्याचे बदलविण्याचे आदेश आहेत. मात्र वनरक्षकांच्या माध्यमातून तेच तेच मजूर नाव बदलवून घेतले जातात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असेही या निवेदनात नमुद आहे.
या निवेदनावर यशवंत कापगते, किशोर पुराम, मनोहर रामटेके, नरेश बावणे, दशरथ पुराम, हेमराज वाढई, जगदीश सीरसाम, नितेश वटी, राहुल रामटेके, मनोज बोरकर, शरद पर्वते, विठ्ठल वरकडे, मनोहर रामटेके, भास्कर कापगते, देवराम पर्वते, ईश्वर घोळांगे, ज्ञानेश्वर सिरसाम, उत्तम सिरसाम, विनायक गेडाम, किसन वाघाडे, यु. श्रा. रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Beneficiaries of Eco Development are deprived of gas subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.