झाडीपट्टीला मिळाला मान

By Admin | Updated: February 22, 2015 01:37 IST2015-02-22T01:37:21+5:302015-02-22T01:37:21+5:30

गेल्या काही वर्षापासून विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला रंग चढला आहे. याचाच अभिमान ग्रामीण भागातील कलावंतांना आहे.

Believers get the shrubbery | झाडीपट्टीला मिळाला मान

झाडीपट्टीला मिळाला मान

बाराभाटी : गेल्या काही वर्षापासून विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला रंग चढला आहे. याचाच अभिमान ग्रामीण भागातील कलावंतांना आहे. आणि झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नाटकाच्या माध्यमातून संगमकुमार नंदागवळी या ग्रामीण भागातील कलावंताने आता संपूर्ण विदर्भ भरारी करुन आपले नाव कमविले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी-बाराभाटी रहिवासी असून वयाच्या २० वर्षापासून नाट्य क्षेत्राशी जुळून आहे. संगमकुमार रेवचंद नंदागवळी (२९) याने डी.एड. पदविका प्राप्त केली. परंतू नोकरी न मिळाल्याने निराश न होता बेरोजगारीवर मात करण्यासाठी या खेड्यातील तरुणाने आपल्या अभिनयासह स्वत: गीत रचना करुन विदर्भाच्या झाडीपट्टीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत या कलावंताने जवळ जवळ संपूर्ण विदर्भाच्या कानाकोपऱ्यात ३५८ नाटकात विविध भूमिका आपल्या अभिनयामधून सादर केल्या आहेत. या संगमकुमारने मुंबई, नागपुर, पुणे, सोलापूर-कोलापूरच्या कलाकारांसोबतही काम केले. यामध्ये रमेश भाटकर, महेश जाधव, अजय सक्सेना, मोहन जोशी आदी सिने अभिनेत्याबरोबर संधी मिळाली हा केवळ झाडीपट्टी रंगभूमीमुळे वर जाण्याचा मान मिळाला आहे.
या ग्रामीण कलावंतानी स्वत:चे गीते तुझे काजळाचे डोळे, तु चांदणी, झाडीचा हिरा मानाचा तुरा, इत्यादी मराठी गीतांच्या कॅसेटमध्ये याचे गीत आहेत. त्यापैकी काही गीते तर प्रत्येक तरुण रसिक मंडळीच्या ओठावर गुण-गुणतांना दिसतात हा तर ग्रामीण भागाचा मोठा गौरवच आहे असे म्हणायला हरकत नाही. या संगमकुमारनी झाडीपट्टीच्या प्रा. शेखर डोंगरे, शेखर पटले, अनिरुद्ध वनकर, सुदाम शेंडे, यशवंत ढोरे, संजय ठवरे, के. आत्माराम, ज्ञानेश्वरी कापगते, भूमाला कुंभरे, किर्ती आवळे, वर्षा गुप्ते, सपना मोरे आदी लेखक, कलावंतासह अभीनय सादर केला. या संगमकुमारला २०१२ मध्ये आम स्वर काव्य पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. रंगशारदा कलासदर म्हसवाणी या मंडळाने यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला, असे अनेक मंडळांनी त्यांच्या अभिनयाची आणि गीतांची त्याबरोबरच त्यांच्या गायकीची झाडीपट्टी खूपच दाद आहे. त्यांचा बहुमान आहे म्हणूनच हा ग्रामीण भागातील कलावंताने विदर्भाची भरारी मारली आहे व आपल्या नावारुपाची किमया टिकविली आहे. (वार्ताहर)

Web Title: Believers get the shrubbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.