कचारगड महोत्सवाला सुरूवात

By Admin | Updated: January 31, 2015 23:22 IST2015-01-31T23:22:21+5:302015-01-31T23:22:21+5:30

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कचारगड यात्रा महोत्सव होत आहे. याची सुरूवात शनिवारी झाली. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या

The beginning of Kachargad Mahotsav | कचारगड महोत्सवाला सुरूवात

कचारगड महोत्सवाला सुरूवात

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : चार दिवस चालणार विविध कार्यक्रम
सालेकसा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कचारगड यात्रा महोत्सव होत आहे. याची सुरूवात शनिवारी झाली. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या सोई सुविधा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी प्रत्यक्ष यात्रा परिसराची शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पाहणी केली.
या भेटीच्या वेळी क्षेत्राचे जनप्रतिनीधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित झाले. यात क्षेत्राचे आमदार संजय पुराम, जिल्हा शल्य चिकित्सड डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवने, देवरीचे उपविभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी देवरे, राकेश शर्मा, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेंद्र घागरे, प्रभारी खंडविकास अधिकारी मडामे, पंचायत समितीचे उपसभापति मनोज विश्वकर्मा, शंकर मडावी, डॉ.डी.बी. चिमणे, सालेकसा येथील विविध विभागाचे विभाग प्रमुख, ईतर अधिकारी व कर्म:चारी व कार्यक्षेत्रातील जनप्रतिनीधी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवने, पोलीस उपविभागी अधिकारी देवरे, राकेश शर्मा, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र घागरे, पंचायत समितीचे उपसभापती मनोज विश्वकर्मा, डॉ.डी.बी. चिमणे या सर्वांसह सर्व परिसराची धनेगाव पासुन ते पहाडी वरील मंदिर परिसरापर्यंत प्रत्येक्ष स्थानांची पाहणी केली. यात्रेकरूच्या सुरक्षीततेची व परिसरातील विविध विभागांच्या द्वारे देण्यात येणाऱ्या सोई व सुविधांची पाहणी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी आरोग्य विभागाकडुन देण्यात येणाऱ्या रूग्णालय सालेकसा येथील डॉ.महेंद्र घागरे यांची चमू व रूग्णवाहिका ही यात्राचे स्वयंपाक कार्यालयाजवळ २४ तास उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच १ मोबाईल मेडिकल फिरते पथक सालेकसा डोगर पायथ्यापासी असे एकंदरीत ७ पथकांच्या माध्यमातुन यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना व श्रद्धालुंना पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरविण्यात येईल. तसेच रात्रकालीन पथक ही लावण्यात आलेले आहेत.
यात्रेत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता दैनंदिन जवळ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार, परिचर व स्वच्छक, आशा कार्यकर्ता असे एकुण ७० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन आरोग्य सेवा दैनंदिन पुरविण्यात येईल. याप्रकारे यात्रेकरीता आरोग्य यंत्रणा औषधीसाठ्यासह सज्ज राहिल. तीव्र परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र दर्रेकसा येथे रूग्णास दाखल करून उपचार देण्यात येईल. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी जिल्हाधिकारींना दिली. त्याच प्रकारे जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांसह जमाकुडो या ईमारतीच्या नवीन बांधकामाचीही प्रत्येक स्थानावर जाऊन पहाणी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The beginning of Kachargad Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.