पोलिसांमुळेच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:13 IST2018-01-07T21:12:47+5:302018-01-07T21:13:01+5:30

सदैव तत्पर राहून नागरिकांचे संरक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. पोलिसांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षीत असल्याची भावना निर्माण होते. पोलीस व नागरिक यांच्यात मैत्रीपूर्ण स्नेहभाव निर्माण झाल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकेल.

Because of the police, citizens' sense of security | पोलिसांमुळेच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना

पोलिसांमुळेच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना

ठळक मुद्देकिशोर पर्वते : पोलीस स्थापना दिवस ‘रेझिंग डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : सदैव तत्पर राहून नागरिकांचे संरक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. पोलिसांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षीत असल्याची भावना निर्माण होते. पोलीस व नागरिक यांच्यात मैत्रीपूर्ण स्नेहभाव निर्माण झाल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकेल. पोलीस आपले मित्रच असून पोलिसांमुळेच आपण सुरक्षीत आहोत, ही भावना अधिकाधिक वृध्दींगत व्हावी, असे मत डुग्गीपारचे ठाणेदार किशोर पर्वते यांनी व्यक्त केले.
डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिवस रेजींग डे साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. हायस्कूलचे शिक्षक ए.पी. मेश्राम, ए.आर. कुथीलकर, सावळकर, चंदेल, चौधरी, राऊत उपस्थित होते. कार्यक्रमात जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ९ ते १२ चे उपयोगात आणत असलेल्या विधी शस्त्रांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात चालणाºया कारभाराविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पोलीस अधिकाºयांनी दिले. प्रास्ताविक चंदेल यांनी मांडले. संचालन बरेले यांनी केले. आभार राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी जि.प. हायस्कूलचे शिक्षक, शालेय मंत्रिमंडळ व पोलीस कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Because of the police, citizens' sense of security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.