वनकर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण

By Admin | Updated: March 18, 2016 02:08 IST2016-03-18T02:08:35+5:302016-03-18T02:08:35+5:30

जंगलात वनवा लावण्याच्या संशयावरून काहीच दोष नसताना येथे राहणाऱ्या भास्कर गणू बोरकर ..

Beaten assault by the Forest Workers | वनकर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण

वनकर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण

वनवा लावल्याचा संशय : दोन कर्मचाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल
केशोरी : जंगलात वनवा लावण्याच्या संशयावरून काहीच दोष नसताना येथे राहणाऱ्या भास्कर गणू बोरकर याला वनकर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. ही घटना १५ रोजी सायंकाळी ४ वाजता आंभोरा जंगलात घडली.
तक्रारीवरून पोलिसांनी दोन वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, केशोरी येथील भाष्कर गणू बोरकर (५०) हा इसम काही कामासाठी जंगलात गेला असता वनरक्षक एम.के.मडावी आणि सय्याम यांनी त्याला पकडून कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता जंगलात वनवा लावण्याच्या संशयावरून हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने त्याच्या पायावर व पाठीवर जबर मारहाण केली. त्यामुळे त्याला जबर मोठी दुखापत झाली.
गावापर्यंत येताना त्याला मार असह्य झाल्याने घडलेला प्रकार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश नाकाडे यांना कथन केला. त्यांनी ताबडतोब त्याला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देऊन औषधोपचार केला. या प्रकरणाची माहिती वनक्षेत्राधिकारी विजय गंगावणे यांना दिली. शेवटी तोंडी तक्रारीवरून आणि वैद्यकीय अभिप्रायावरुन वनरक्षक एम.के. मडावी आणि सय्याम यांचेविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Beaten assault by the Forest Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.