शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

दिवाळीची ऑनलाइन खरेदी करताना काय काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:58 IST

Gondia : बनावट लिंकवरून खरेदी केली तर होऊ शकते फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दिवाळीचा सण आता तोंडावर येऊ लागला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सध्या ऑनलाइनखरेदी वाढली असून, त्यात फसवणुकीचा धोकाही वाढू लागला आहे.

मागील काही वर्षांमध्ये ऑनलाइन खरेदीचे प्रकार वाढले आहेत. दिवाळीमध्ये ऑनलाइन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी केली जाते. परंतु, ही खरेदी करीत असताना कोणत्या साइटवरून करावी? कोणते अॅप खरे ? कोणते खोटे ? याची माहिती नसते आणि त्यातून फसवणूक होण्याची शक्यता वाढते. अशी काही प्रकरणेही घडली आहेत. ऑफरला भुलून कोणत्याही लिंकवरून खरेदी केली तर फसवणूक होईल. त्यामुळे दिवाळीची ऑनलाइन खरेदी करीत असताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

ऑनलाईन खरेदी करताना हे ध्यानात ठेवा

  • सुरक्षित वेबसाईट : आपण ज्या ऑनलाइन लिंकवरून खरेदी करीत आहोत, ती वेबसाईट सुरक्षित आहे का? याची तपासणी करून घ्यावी. 
  • अनोळखी लिंक टाळा: सोशल मीडियावर लिंक देऊन खरेदीची ऑफर दिली जाते, अशा अनोळखी लिंकवरून खरेदी करणे टाळावे. 
  • बँक खाते, कार्डचा तपशील सांभाळा कोणत्याही लिंकवर बँक खाते क्रमांक आणि कार्डचा तपशील विनाकारण देऊ नये. 
  • अनोळखी अॅप टाळा : अनोळखी अॅपवरून खरेदी करणे टाळावे. विश्वासार्हता लक्षात घ्या. 
  • ओटीपी शेअर नको : कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी शेअर करू नये.

कस्टमर केअर नंबर शोधताना काय काळजी घ्याल ? खरेदी केल्यानंतर काही अडचणी निर्माण होतात. मग त्यानंतर कस्टमर केअर क्रमांक शोधला जातो. तो ऑनलाइन शोधू नये, अधिकृत अॅपवर कस्टमर केअर क्रमांक २ दिलेला असतो. त्यावरच संपर्क साधावा.

तर तीन तासांत करा सायबरकडे तक्रार फसवणूक झाल्यास सायबरकडे तक्रार करणे अनिवार्य आहे. तीन तासांत तक्रार केली तर नुकसान टळू शकते.

सायबरच्या पोर्टलवरही करता येते तक्रार cybercrime.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन रितसर तक्रार नोंदविता येते. या संकेतस्थळाला भेट दिली पाहिजे.

सुरक्षितता तपासा "ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. एचटीपीपीएस अशी सुरुवात असणाऱ्या वेबसाईटच वापरा. एस म्हणजे 'सेक्यूअर' खरेदी करतानाही 'कॅश ऑनडिलव्हरी' चांगला पर्याय आहे, तो वापरावा. अॅपची विश्वासार्हता तपासावी." - किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, गोंदिया शहर

टॅग्स :gondiya-acगोंदियाonlineऑनलाइनShoppingखरेदी