सावधान ! कोरोनाचा ग्राफ वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:00:03+5:30
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी १५७४ चाचण्या करण्यात आल्या. यात १३२५ आरटीपीसीआर तर २३९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. ७३ नमुने कोरोना बाधित आढळले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ टक्के आहे. तर तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली आहे.

सावधान ! कोरोनाचा ग्राफ वाढतोय
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने बाधितांची द्विशतकीय वाटचाल सुरु झाली आहे. शुक्रवारी ४४ तर शनिवारी (दि.८) ७३ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी १५७४ चाचण्या करण्यात आल्या. यात १३२५ आरटीपीसीआर तर २३९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. ७३ नमुने कोरोना बाधित आढळले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ टक्के आहे. तर तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४७७२०० चाचण्या करण्यात आल्या. यात २५१९५५ आरटीपीसीआर तर २२५२४५ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या.
यात ४१४२३ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५३९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे १७३ रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह आहे.
पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय
- मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चार दिवसात १३० वर बाधितांची नोंद झाली आहे. रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याने पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा वाढत आहे. शनिवारी ७३ रुग्णांची नोंद झाल्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ वर पोहचला आहे.
चार दिवसात वाढले १५३ रुग्ण
- मागील चार दिवसांत जिल्ह्यात १५३ बाधितांची भर पडली. शनिवारी ७३ कोरोना बाधितांची भर पडली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होय.
केवळ दहा रुग्ण रुग्णालयात
जिल्ह्यात सध्या स्थितीत १७३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी केवळ १० रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. तर १६३ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.