शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

By अंकुश गुंडावार | Updated: November 8, 2024 07:57 IST

Maharashtra Assembly Election 2024: गोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढाई अर्जुनी मोरगावमध्ये होत आहे. येथे चेहरे जरी बडोले व बन्सोड असले तरी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.

- अंकुश गुंडावारगोंदिया :  जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढाई अर्जुनी मोरगावमध्ये होत आहे. महायुतीतील अजित पवार गटाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापून भाजपचे माजी आ. राजकुमार बडोले यांना पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतील काँग्रेसने येथे स्थानिक उमेदवार डावलून मतदारसंघाबाहेरील माजी आमदार दिलीप बन्सोड यांना उमेदवारी दिली.

येथे चेहरे जरी बडोले व बन्सोड असले तरी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे हा गड कोण सर करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. काँग्रेसने दिलीप बन्सोड यांना उमेदवारी दिल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेसला यश आले असले तरी स्थानिकांच्या नाराजीची कुरबूर आहेच. दुसरीकडे मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुलगा सुगत यांना प्रहारकडून रिंगणात उतरविले आहे. ते किती मतविभाजन करतात, हे पाहावे लागेल. महायुतीमुळे बडोले यांची ताकद वाढली असली तरी ऐनवेळी ‘नाना’ तऱ्हा काय चमत्कार घडवितात ते महत्त्वाचे ठरेल.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे- हे सर्वाधिक धान उत्पादक क्षेत्र. मात्र धानावर प्रक्रिया उद्योगाचा येथे अभाव आहे. परिणामी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल. - एमआयडीसीसाठी जागा आरक्षित मात्र उद्योगांची वानवा. बेरोजगारीची समस्यामोठी. येथे उद्योगांची स्थापना केल्यास रोजगार निर्मितीस मदत होईल. या मतदारसंघात मोठे सिंचन प्रकल्प आहेत, पण त्यावर मत्स्य व्यवसाय विकसित करण्याकडे दुर्लक्ष.- कृषी महाविद्यालयाची मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाही. कृषी तंत्रज्ञानापासून तरुण वर्ग दूर.- नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसर लाभला असला तरी पर्यटनांचा दृष्टीकोनातून या परिसराचा विकास अद्याप झालेला नाही.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPraful Patelप्रफुल्ल पटेलNana Patoleनाना पटोलेRajkumar Badoleराजकुमार बडोले