घाटटेमनीत बांधकामाचा पराक्रम
By Admin | Updated: February 25, 2015 00:12 IST2015-02-25T00:12:17+5:302015-02-25T00:12:17+5:30
घाटेमनी येथील ग्रामपंचायतने कामठा मार्गावरील अनुसूचित जातीकरिता बांधण्यात येणाऱ्या बेघर झोपडीचे बांधकाम चार वर्षापासून सुरू केले.

घाटटेमनीत बांधकामाचा पराक्रम
आमगाव : घाटेमनी येथील ग्रामपंचायतने कामठा मार्गावरील अनुसूचित जातीकरिता बांधण्यात येणाऱ्या बेघर झोपडीचे बांधकाम चार वर्षापासून सुरू केले. अजूनपर्यंत सदर बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. उलट बेघर झोपडीच्या सुरक्षितेकरिता लावण्यात आलेल्या तावदानाची स्थिती गंभीर आहे. घाटटेमनीच्या सरपंचाच्या बांधकामाचा हा पराक्रम पाहून कोणी बोलायला तयार नाही. काही नागरिकांनी चौकशीची मागणी केली असून दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.
चार वर्षापासून सुरू असलेल्या बेघर झोपडी बांधकामाची तक्रार झाली. अधिकारी यांनी चौकशी केली. मात्र सरपंच रोशनलाल स्वत: काम करीत असल्याने अधिकारी बोलायला तयार नाहीत. गावातील सरपंचानी पदावर राहून हे बांधकाम नियमानुसार करता येत नाही. पण तो नियम रोशनलाल मरस्कोल्हे बाजुला ठेवून बेघर झोपडीचे बांधकाम सुरू केले. बांधकाम मात्र दर्जदार नाही.मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. सरपंच पदाचा पूर्णपणे सरपंचांनी दुरूपयोग केला. शासन नियमाप्रमाणे चार वर्ष बांधकाम करण्याचा कोणताच प्रस्ताव नाही. येथील बांधकाम सन २०११ चे आहे मात्र अजूनपर्यंत पूर्णत्वास गेले नाही. कार्यरत ग्रामपंचायतच चपराशी देशमुख स्वत: लाच सरपंच समजतो. मनमर्जीने काम करने सरपंचाकडे कोरा धनादेश सरपंचाकडे पाठविणे. त्याकरिता ग्रामपंचायतचा अपंग असलेल्या चपराश्याला आदेश देऊन त्याच्याकडून काम केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)