संवैधानिक अधिकाराची लढाई

By Admin | Updated: October 26, 2016 02:40 IST2016-10-26T02:40:28+5:302016-10-26T02:40:28+5:30

संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० नुसार ओबीसींच्या हक्कांची तरतूद केली.

The Battle of Constitutional Rights | संवैधानिक अधिकाराची लढाई

संवैधानिक अधिकाराची लढाई

खुशाल बोपचे : ओबीसी कृती समितीची सभा
अर्जुनी-मोरगाव : संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० नुसार ओबीसींच्या हक्कांची तरतूद केली. मात्र गेली ६० वर्षे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने देशातील ७५ टक्के ओबीसींवर अन्याय सुरु आहे. इंग्रजी राजवटीनंतर ओबीसींची जनगणनाच झाली नाही. आम्ही कुठल्याही राजकीय पक्ष अथवा शासनाच्या विरोधात नाही. येणाऱ्या ८ डिसेंबर रोजी आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसींनी एकत्र येऊन सरकारला जाग आणावी असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.
ते ओबीसी कृती समितीच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्येअ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी हिरामन लंजे, जि.प. सदस्य किशोर तरोणे, खेमेंद्र कटरे, गिरीष बागडे, नविन नशिने, सेवा. सह संस्था संचालक लोकेश हुकरे, ललीत बाळबुद्धे, नगरसेवक मुकेश जायस्वाल, राजू शिवणकर, मनोहर शहारे, बालू बडवाईक, रत्नाकर बोरकर, ओमप्रकाश सिंह पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालन नूतनलाल सोनवाने, अश्विन गौतम, चेतन शेंडे, कृउबास संचालक सोमेश्वर सौंदरकर, राहूल ब्राम्हणकर, राजू बेनीकर, प्रा. भालचंद्र पटले, प्रमोद लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Battle of Constitutional Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.