बॅरि.राजाभाऊ ज्यु. कॉलेज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:33 IST2021-08-20T04:33:03+5:302021-08-20T04:33:03+5:30

ग्रामपंचायत साखरीटोला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सरपंच नरेश कावरे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अफरोज पठाण, ग्रा.पं. सदस्य ...

Barry.Rajabhau Jew. College () | बॅरि.राजाभाऊ ज्यु. कॉलेज ()

बॅरि.राजाभाऊ ज्यु. कॉलेज ()

ग्रामपंचायत साखरीटोला

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सरपंच नरेश कावरे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अफरोज पठाण, ग्रा.पं. सदस्य डॉ. अजय उमाटे, वसंत साखरे, गौरव कोडापे, सुनिता चकोले, श्वेता अग्रवाल, सुमन ठाकरे, सुषमा काळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक, पोलीस, पटवारी उपस्थित होते.

जि.प. हायस्कुल

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्राचार्य ए.एन. आसोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच नरेश कावरे होते. तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

श्री विद्या गर्ल्स हायस्कुल ()

मुख्याध्यापिका अजया चुटे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शिक्षक उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

ग्रामपंचायत कारुटोला

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा ध्वजारोहणाने ग्रामपंचायतच्या पटांगणावर साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सरपंच उमराज बोहरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी उपसरपंच बुधराम जिंदाकूर, सदस्य गीता गोंडाणे, टिकेश्वरी कटरे, नंदकिशोर चुटे, धनराज कोरे, विद्या बागडे, खेलू फुंडे, गुणवंता शिवणकर, सुनिता सलामे, अनिता थेर, ग्रामसेवक ओ.के.रहांगडाले उपस्थित होते.

Web Title: Barry.Rajabhau Jew. College ()