तालुुका काँग्रेस कमिटीतर्फे बन्सोड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST2021-06-29T04:20:03+5:302021-06-29T04:20:03+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे होते. सत्कारमूर्ती माजी आमदार दिलीप बन्सोड, युवा नेते अशोक (गप्पू) गुप्ता, शेतकरी काँग्रेस आघाडीचे ...

Bansod felicitated by Taluka Congress Committee | तालुुका काँग्रेस कमिटीतर्फे बन्सोड यांचा सत्कार

तालुुका काँग्रेस कमिटीतर्फे बन्सोड यांचा सत्कार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे होते. सत्कारमूर्ती माजी आमदार दिलीप बन्सोड, युवा नेते अशोक (गप्पू) गुप्ता, शेतकरी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जितेश राणे, ठानसिंग चव्हाण, माजी जि. प. सदस्य डुमेंद्र चौरागडे, राजकुमार पटले यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, माजी तालुका अध्यक्ष राधेश्याम बगडीया, आमगाव तालुकाध्यक्ष संजय बहेकार, सालेकसा तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, देवरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्रा अगडे, सालेकसा तालुका महिला अध्यक्ष लता दोनोडे, तालुका महासचिव बनीराम कोटवार, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, जि. प.चे माजी समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, संदीप भाटीया, आदी उपस्थित होते.

Web Title: Bansod felicitated by Taluka Congress Committee