बँकांचे कामकाज केवळ २० दिवस
By Admin | Updated: January 6, 2015 23:04 IST2015-01-06T23:04:08+5:302015-01-06T23:04:08+5:30
बँक कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा संप यासह हक्काच्या दोन सुट्या व पाच शनिवार अर्धवेळ काम होणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीचा जानेवारी महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनाचा

बँकांचे कामकाज केवळ २० दिवस
गोंदिया : बँक कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा संप यासह हक्काच्या दोन सुट्या व पाच शनिवार अर्धवेळ काम होणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीचा जानेवारी महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनाचा तर ग्राहकांसाठी आर्थिक त्रासाचा ठरणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या संघटनेने या महिन्यात संपाची हाक दिल्याने बँक क्षेत्रासाठी नववर्षाचा पहिलाच महिना संप व आंदोलनांनी गाजणार आहे. या संबंधिचा निर्णयही युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने (युएफसी) घेतला आहे. पहिला संप ७ जानेवारीला होणार असून याच महिन्यात २१ ते २४ दरम्यान सलग चार दिवस बँक उद्योग ठप्प ठेवण्याचा पवित्राही घेतला आहे.