५० हजार लोकांची अपेक्षाभंग करणारी बँक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:59+5:302021-09-10T04:35:59+5:30

विजय मानकर सालेकसा : तालुक्यातील ९५ हजार लोकसंख्येला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बँक सेवा देण्यासाठी सुरू असलेली बँक ऑफ महाराष्ट्र ...

Bank that disappoints 50,000 people () | ५० हजार लोकांची अपेक्षाभंग करणारी बँक ()

५० हजार लोकांची अपेक्षाभंग करणारी बँक ()

विजय मानकर

सालेकसा : तालुक्यातील ९५ हजार लोकसंख्येला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बँक सेवा देण्यासाठी सुरू असलेली बँक ऑफ महाराष्ट्र लोकांना सेवा देण्याऐवजी नेहमी ५० हजार लोकांच्या अपेक्षाभंग करीत कसलीही सेवा प्रदान करताना दिसत नाही. त्यामुळे एकमात्र राष्ट्रीय बँक म्हणून सुरू असलेली ही बँक कोणासाठी व कशासाठी चालत आहे असा एकच प्रश्न लोक विचारत आहेत.

जवळपास ८७ गावांचा विचार करीत सालेकसा मुख्यालयाच्या ठिकाणी २० वर्षापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा सुरु करण्यात आली. शाखा व्यापारी, कर्मचारी, शेतकरी व कामगार इत्यादी लोकांसाठी फायद्याची ठरत राहिली. एकमेव राष्ट्रीयकृत बँक तालुक्यात असल्याने लोक या बँकेला महत्त्व देऊ लागले. परंतु कालांतराने या बँकेतून लोकांच्या अपेक्षा भंग होऊ लागल्या असून सुद्धा ग्राहकांनी याच बँकेत देवाण-घेवाण करण्याला महत्त्व दिले. तरी सुद्धा बँक व्यवस्थापकाने लोकांच्या अपेक्षनेनुसार सेवा दिली असावी हे कधीच दिसून आले नाही. कालांतराने तालुक्यातील साखरीटोला येथे सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा उघडण्यात आली. परंतु त्या शाखेत सुद्धा लोकांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमी येत आहेत

Web Title: Bank that disappoints 50,000 people ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.