बाम्हणी - आमराईटोला रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST2021-09-16T04:36:20+5:302021-09-16T04:36:20+5:30

आमगाव - देवरी मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरण सुरू आहे. हे काम संथगतीने होत असल्याने कंपनीद्वारा काम पूर्ण करण्यास दिरंगाई ...

Bamhani - Amraitola road in a ditch | बाम्हणी - आमराईटोला रस्ता खड्ड्यात

बाम्हणी - आमराईटोला रस्ता खड्ड्यात

आमगाव - देवरी मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरण सुरू आहे. हे काम संथगतीने होत असल्याने कंपनीद्वारा काम पूर्ण करण्यास दिरंगाई होत आहे. ठिकठिकाणी पुलाचे काम रखडले आहे. काही ठिकाणी अर्धवट पूल तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी पुलाचे काम पूर्ण झाले त्यांचे सपाटीकरण करण्यात आले नाही, तर बाम्हणी ते आमराईटोला मार्गाचे कोणतेही सिमेंटीकरण करण्यात आले नाही. या मार्गावर रेल्वेगेट आहे. रेल्वेगेट ते आमराईटोला मार्गावर नाल्यावरील लहान पूल असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून राहाते, त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेता येत नाही. रेल्वेगेटपासून पूर्ण रस्ता उखडला आहे. या रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. पण, याकडे विभागाचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळे या रस्त्याची समस्या कायम आहे.

Web Title: Bamhani - Amraitola road in a ditch