पेरणीपूर्व कामाला लागला बळीराजा

By Admin | Updated: May 19, 2014 23:38 IST2014-05-19T23:38:41+5:302014-05-19T23:38:41+5:30

तीव्र ऊन तापत असतांनाही जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकासाठी पेरणीपूर्व कामाला लागला आहे. यंदा लवकर मानसून असल्याने शेतकर्‍यांची पेरणीपूर्व कामासाठी

Baliaraja had started work in pre-sowing | पेरणीपूर्व कामाला लागला बळीराजा

पेरणीपूर्व कामाला लागला बळीराजा

गोंदिया : तीव्र ऊन तापत असतांनाही जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकासाठी पेरणीपूर्व कामाला लागला आहे. यंदा लवकर मानसून असल्याने शेतकर्‍यांची पेरणीपूर्व कामासाठी लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामासाठी पेरणी पुर्व कामाला वेग आलेला दिसत आहे. बळीराजा घराबाहेर पडून आपल्या शेतीच्या प्रारंभिक कामाला लागला आहे. काही शेतकरी शेतीवर शेणखत टाकत आहेत तर काही नवीन धान बियाणे विकत घेण्यासाठी फिरत आहेत. शेतीत दर्जेदार व भरघोष उत्पादन मिळावे हा प्रत्येक शेतकर्‍यांचे स्वप्न आहेत. काही शेतकरी संकरीत तर काही शेतकरी सुधारित धान बियाणे नवीन वाण खरेदी करण्यासाठी धावपड करू लागले आहेत. यंदा उन्हाळी धानपीक मोठ्याप्रमाणावर लावण्यात आले होते. त्यामुळे अनेक शेतकरी धान कापणी आणि मळणीच्या कामात व्यस्त आहेत. पाऊस पडण्यापूर्वी मळणी आटपून शेणखत टाकण्याच्या उद्देशाने लगबगीने दिवस रात्र कामात गुंतले आहेत. काही शेतकर्‍यांनी तर धान कापणी करण्यापूर्वीच वेळ काढून शेणखत टाकण्याचे काम आपल्या मळजमीनीत केला आहे. व आता मळणीच्या कामाला लागला आहे. मात्र तापमान जास्त असल्याने शेतकर्‍याचे मोठे हाल होत आहेत. भर उन्हात धान कापणे व भारे बांधून खड्यावर आणणे म्हणजे तारेवरची कसरत केल्या सारखे आहे. शेतीची कामे अशी असतात की ते वेळेवर करणे आवश्यक असतात. यासाठी उन पाऊस सर्व सारखा मानावे लागतो. यंदा ७ जूनला रात्रीपर्यंत मृग नक्षत्राची सुरूवात होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकात धानाचे मोठे उत्पादन घेत असल्याने या धानाला पोषक ठरणारे शेणखत शेतात टाकण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागात रबी पिके लावली होती. त्यामुळे अनेक शेतकरी रबी पिकाच्या चुरणी व मळणीच्या कामात व्यस्त आहेत. यंदा मान्सूनने हजेरी लावल्याची वार्ता कानी पडताच शेतकर्‍यांची कामासाठी लगबग सुरू झाली आहे. रबीचे पीक पाण्यात सापडू नये यासाठी शेतकर्‍यांचा आटापिटा सुरू आहे. यावर्षी पेरणीच्या कामाला योग्यवेळी सुरूवात करण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. सद्या स्थितीत उष्णतेचा त्रास असला तरी या उष्णतेला न जुमानता शेतकरी पेरणीपुर्व कामात व्यस्त आहेत. काही शेतकरी सायंकाळच्या वेळी शेतातील कुडा- कचरा आगीच्या स्वाधीन करताना दिसत आहेत. कधी पूर, कधी अवर्षण या निसर्गाच्या चक्रात आपले पिक अडकू नये यासाठी योग्यवेळी पेरण्याकरून खरीप पिक घेण्याच्या तयारीत शेतकरी असल्याचे चित्र दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Baliaraja had started work in pre-sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.