बकी जि.प. शाळेत डिजीटल लर्निंग सुरु
By Admin | Updated: November 7, 2015 01:53 IST2015-11-07T01:53:34+5:302015-11-07T01:53:34+5:30
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी येथे जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत लोकसहभागातून डिजीटल लर्निंग प्रकल्पाचे उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे ...

बकी जि.प. शाळेत डिजीटल लर्निंग सुरु
सडक अर्जुनी : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी येथे जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत लोकसहभागातून डिजीटल लर्निंग प्रकल्पाचे उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण सभापती देवराम वडगाये यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विलास शिवणकर, खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, गटशिक्षणाधिकारी मेश्राम, केंद्रप्रमुख डी.टी. बावनकुडे, पंचायत समितीचे सदस्य गिरधारी हत्तीमारे, अर्जुन घरोटे, सरपंच अल्का रामटेके, उपसरपंच क्रिष्णा कोरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे, मनोज उईके, खुशाल तरोणे, रेशमा मोटघरे, साधना कडूकार, ओमप्रकाश कुरसुंगे, लक्ष्मीकांत धानगाये, वसंत गहाणे उपस्थित होते.
आदिवासीबहुल भागात असलेली जि.प. प्राथमिक बकी ही चांगल्या दर्जाची शाळा असून गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी गावकऱ्यांच्या सहभागातून ६७ हजार ७५० रुपयांची लोकवर्गणी गोळा करुन शिक्षकांच्या मार्गदर्शनात डिजीटल लर्निंगचे साहित्य खरेदी केले. पहिली ते सातवीच्या वर्गांच्या विषयांवर अॅनिमेशन नियोजन तयार करण्यात आले व कमी खर्चात डिजीटल लर्निंग सुरू करण्यात यश आले.
या वेळी खंडविकास अधिकारी टेंभरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी शिक्षणाधिकारी, विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगराज गहाणे, सुरेश वरठी, धवन फुंडे, आनंदराव फुंडे, अशोक कांबळे, संदेश रंगारी यांनी सहकार्य केले. संचालन व आभार मुख्याध्यापक एम.एम. परशुरामकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)