बजरंग दल कार्यकर्त्यांनी जनावरे कोंबून नेणारे मिनी मेटॅडोर पकडले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:08+5:302021-07-25T04:25:08+5:30

जनावर भरलेले दोन मिनी मेटॅडोर क्रमांक एमएच ३५-एएल ०६४३ व वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १४९१ मध्ये गुरांना कोंबून ...

Bajrang Dal activists seize mini matador carrying animals () | बजरंग दल कार्यकर्त्यांनी जनावरे कोंबून नेणारे मिनी मेटॅडोर पकडले ()

बजरंग दल कार्यकर्त्यांनी जनावरे कोंबून नेणारे मिनी मेटॅडोर पकडले ()

जनावर भरलेले दोन मिनी मेटॅडोर क्रमांक एमएच ३५-एएल ०६४३ व वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १४९१ मध्ये गुरांना कोंबून आमगाव तालुक्यातील पाऊलदौना येथून नागपूरला जात असल्याची गुप्त सूचना बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती. या आधारावर बजरंग दल जिल्हा सहसंयोजक बाळाराम व्यास आणि जनार्दन तळस यांच्या नेतृत्वात प्रणव मेश्राम, रोशन बोळणे व सोनू डोये यांनी शनिवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दोन्ही मिनी मेटॅडोर थांबवून तपासणी केली. यात त्यांना दोन्ही वाहनांमध्ये निर्दयतेने जनावरे कोंबलेली आढळून आली. वाहनचालकांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना जनावरांसहित पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Bajrang Dal activists seize mini matador carrying animals ()