शेतकऱ्याच्या सायकलवरून पळविली पैशांची पिशवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:31 IST2021-09-21T04:31:58+5:302021-09-21T04:31:58+5:30

गोंदिया : सायकलने जात असलेल्या शेतकऱ्याची पैशांची पिशवी दोघा मोटारसायकलस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम ...

A bag of money snatched from a farmer's bicycle | शेतकऱ्याच्या सायकलवरून पळविली पैशांची पिशवी

शेतकऱ्याच्या सायकलवरून पळविली पैशांची पिशवी

गोंदिया : सायकलने जात असलेल्या शेतकऱ्याची पैशांची पिशवी दोघा मोटारसायकलस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम परसोडी येथील आरोग्य केंद्राच्या डांबरी रस्त्यावर १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

ग्राम डोंगरगाव येथील शेतकरी खेमचंद रूपचंद राणे (५३) यांनी विक्री केलेल्या धानाचे ५३ हजार ७९० को रुपये को-ऑपरेटिव्ह बँकेतून काढून कत्थ्या रंगाच्या पिशवीत ठेवले. ही पिशवी सायलकलच्या हॅन्डलला लटकावून ते परसोडीमार्गे डोंगरगाव येथे जात होते. परसोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर गोंदिया ते कोहमारा डांबरी रस्त्यवर गोंदियाकडून येणाऱ्या निळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर मागे बसलेल्या इसमाने सायकलच्या हॅंडलला लटकविलेली पैशांची पिशवी जबरजस्तीने ओढून पसार झाले. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पांढरे करीत आहेत.

Web Title: A bag of money snatched from a farmer's bicycle