सावत्र बापाच्या त्रासाने तरूणीची भटकंती

By Admin | Updated: November 2, 2016 00:27 IST2016-11-02T00:27:08+5:302016-11-02T00:27:08+5:30

येथील एका अनोळखी घरी तरूणीने आश्रम घेतला. घर मालकाने तरूणीची जेवणाची व्यवस्थाही केली.

Babu wanders with stepfather's suffering | सावत्र बापाच्या त्रासाने तरूणीची भटकंती

सावत्र बापाच्या त्रासाने तरूणीची भटकंती

गोठणगाव : येथील एका अनोळखी घरी तरूणीने आश्रम घेतला. घर मालकाने तरूणीची जेवणाची व्यवस्थाही केली. परंतु ती आहे कोण? तिच्या चौकशीवरून आपल्याघरी रात्रभर ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तरुण व घरमालक अडचणीत आले. पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून तरुणीला पोलीसांच्या मदतीने तिच्या आई-वडिलांकडे रात्री १०.३० वाजता सोडण्यात आले. सदर घटना २८ आॅक्टोबरला घडली.
सविस्तर वृत्त असे की, पायल दरवडे (१७) रा. कुंभीटोला-बाराभाटी येथे आपल्या आई व सावत्र वडील मन्साराम बागडे यांच्यासोबत राहत होती. एक दिवस पायल व मन्साराम यांच्या सोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे पायलला मन्सारामने मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात पायल गावोगावी भटकत होती. २८ आॅक्टोबरला केशोरी येथे सायंकाळी ५ वाजता बसमध्ये बसली. त्याच बसमध्ये गोठणगाव येथील आशासेविका पर्यवेक्षक किरसान होत्या. त्या गोठणगावला उतरल्या. त्यांचाबरोबर पायल उतरली. बसच्या ड्रायव्हरने पायलला ओळखले. ते बाराभाटी-कुंभीटोलाचे राहणारे होते. म्हणून नवेगावबांधपर्यंत नेण्याचे ठरविले. परंतु पायलने नाकारले.
पायलने विनोद किरसान यांच्याकडे आश्रय घेतला. चौकशी केल्यानंतर पायल ओळखीच होती. पायलला जेवण दिले. त्यानंतर ती जर रात्रीला कुठेही निघून गेल्यास आपण अडचणीत येणार म्हणून पोलीस पाटील कारूसेना सांगोळे यांच्याशी संपर्क केला. पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनरीवरून संपर्क साधून सर्व हकीकत ठाणेदार प्रशांत भस्मे यांना सांगितली.
ठाणेदारांनी तत्परता दाखवून पोलीस स्टेशनच्या गाडीने रात्री १०.३० वाजता कुंभीटोला-बाराभाटी येथे सोडण्यात आले. बिट हवलदार गणवीर, गौरी, वाहन चालक मडामे, पोलीस पाटील कारूसेना सांगोळे, ग्रा.पं. सदस्य विद्याधर निर्वाण, हिरा कोसरे यांच्या मदतीने तिला सोडण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Babu wanders with stepfather's suffering