ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

By Admin | Updated: April 15, 2017 00:57 IST2017-04-15T00:57:24+5:302017-04-15T00:57:24+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

Babasaheb honored at the spot | ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांपासून तर अनेक संस्था, संघटनांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
ग्राम पंचायत तेढा
तेढा-निंबा : येथील ग्राम पंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सरपंच रत्नकला भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी ग्रा.पं.सदस्य खेमराज उईके, सिंधु सागोळकर, वच्छला राऊत, हिरोज राऊत, शैलेंद्र वाघमारे, प्रमोद साखरे, संदीप राऊत व नागरिक उपस्थित होते. यावेळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
विदर्भ प्रदेश विकास परिषद
गोंदिया : विदर्भ प्रदेश विकास परिषद गोंदियातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जिल्हाध्यक्ष मोनू राठौड यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून अ‍ॅड. चंद्रशेखर गजभिये, अ‍ॅड. सतीश सुखदेवे, अ‍ॅड. राय, अभिनव सुखदेवे, बबलू कुरील उपस्थित होते.
मनोहर म्युनिसिपल हायस्कूल
गोंदिया : मनोहर म्युनिसिपल हायस्कूल येथे मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून पर्यवेक्षक राजेंद्र धाबर्डे, हेमराज शहारे, सुनिल रहांगडाले, हेमराज बोकाडे, रविशंकर बिसेन, रेखा पाटणकर, प्रमोद सोनवाने, दिप्ती तावाडे, अजेस टेकाम, सुलभा चौधरी उपस्थित होते. संचालन व आभार दामोदर धुवारे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मधुकर जाधव, किशोर तावाडे, शारदा कुंभरे, शिवकुमार उपरीकर, प्रिया सालवे, दुर्गा शहारे उपस्थित होते.
जीईएस हायस्कूल पांढराबोडी
गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेतर्फे संचालित जीईएस हायस्कूल आणि कला, विज्ञान महाविद्यालय पांढराबोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रभारी मुख्याध्यापक एम.एम.बैस यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून ए.जी.टेंभरे, प्रा.एस.सी.सुखवार, विनोद माने, एस.एच.पोरचट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जी.एम.दुधबरई यांनी केले.
कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालय आसोली
गोंदिया : प्रांजल शिक्षण संस्थेतर्फे संचालित के.एम.कोल्हटकर, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसोली येथे प्राचार्य विजय टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. अजय वाढई, भूमेश्वरी कटरे, मिनाक्षी मेश्राम, गीता गणविर, राकेश बोरकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत, कविता सादर करून भाषण दिले.
पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था
गोंदिया : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था शाखा गोंदियाच्या वतीने संचालक सुरेशगीर रिधनार्थी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी खु.व्ही.नागफासे, एस.के.भोयर, एस.बी.रहांगडाले, डी.ए.वरखडे, मंगरु हिरापुरे, मुकेश लामटे उपस्थित होते.
वनविभाग आमगाव
आमगाव : वनविभाग आमगावतर्फे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डी.बी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला क्षेत्र सहायक एल.एस.भुते, भांडारकर, शितलादेवी येडे, एस.एम.पवार व इतर कर्मचारी उपस्त्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यालय
इटखेडा : येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती तसेच नवोदित शिक्षण संस्था इटखेडाचे माजी मुख्य संस्थापक सचिव स्व. डॉ.महादेवराव शेंडे यांचा १३ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक जे.जी.करंजेकर, वाय.पी.फुंडे, ग्रा.पं.सदस्य चेतन शेंडे होते.गावातील आनंद बुध्द विहार येथील पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली.
संचालन सांस्कृतिक प्रमुख एस.एम.आकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी एफ.आर.भाकरे, संजय खुणे, जे.पी.मेश्राम, वाय.के.मेश्राम, एच.एस.आदे, पी.एम.डोंगरवार, प्रा. खुशाल पेशने, प्रा. अनिल भावे, हरिभाऊ शेंडे, हटवार, राजू शेंडे यांनी सहकार्य केले.
नवोदय हायस्कूल केशोरी
केशोरी : स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती प्रभात फेरी काढून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक हलमारे, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक नरेंद्र काडगाये, प्रा. प्रकाश बोरकर, प्रा. रवि शिंगणजुडे, प्रा. हिवराज साखरे, चरण चेटुले, एस.बी.रहांगडाले, आर.एस.वंजारी, प्रा. दिनेश नाकाडे, आर.एम.मारबते, नुतन चेटुले, भावना उईके उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील लोकगीते आणि भाषणे सादर केलीत. प्रास्ताविकातून प्रा. मुरलीधर मानकर, संचालन भावना उईके तर आभार श्रीनिवास कॉलेजवार यांनी मानले. यावेळी प्रा.हिवराज साखरे, आर. एस. वंजारी, एम.एस.काडगाये यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद हायस्कूल
सडक-अर्जुनी : येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुख्याध्यापिका एम.एन.भौतिक यांच्या अध्यक्षतेखाली साजरी टरण्यात आली.
अतिथी म्हणून आर.एस.डोये,

Web Title: Babasaheb honored at the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.