बाबा जुमदेवजींच्या जयघोषाने चिचाळनगरी दुमदुमली
By Admin | Updated: August 26, 2016 01:35 IST2016-08-26T01:35:02+5:302016-08-26T01:35:02+5:30
भगवंतांचा प्रकट दिन, रॅली ठरली आकर्षणाचे केंद्रचिचाळ : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळच्या वतीने ....

बाबा जुमदेवजींच्या जयघोषाने चिचाळनगरी दुमदुमली
चिचाळ येथे कार्यक्रम : भगवंतांचा प्रकट दिन, रॅली ठरली आकर्षणाचे केंद्रचिचाळ : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळच्या वतीने श्रावण वैद्य षष्ठी हवन कार्य पूर्ण करण्यात आले. यावेळी गावातून रॅली काढून महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय, परमात्मा एकच्या जयघोषाने भगवंताचा प्रगट दिन साजरा करण्यात आला.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या परमेश्वरी सिद्धी प्राप्त करून एका भगवंताची प्राप्त केली. तो दिवस श्रावण वैद्य षष्ठीचा असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या दिवशी सर्व सेवक एका भगवंताचा प्रगट दिन म्हणून साजरा करतात. चिचाळ येथील मार्गदर्शक जयराम दिघोरे यांचे घरून परमात्मा एक सेवकांच्या उपस्थितीत भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा हनुमानजी यांची रॅली काढण्यात आली. परमेश्वराने मानवाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले आहे. अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदीत सत्य मानवाची राहावी, अशी शिकवण आहे. परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. भगवान बाबा हनुमानजी की जय, महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय अशा घोषणांनी चिचाळ नगरी दुमदुमुन गेली. रॅली नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रॅलीचे सभेत रुपांतर झाले. अध्यक्षस्थानी मार्गदर्शक जयराम दिघोरे तर प्रमुख उपस्थितीत वासुदेव लेंडे, भाऊदास पडोळे, परसराम दिघोरे, प्रकाश हातेल, निमराज काटेखाये, कैलाश गडकर, गोविंदा तिभागेवार, गोमा लोहकर, शोभा काटेखाये, सुनिता हातेल, भीवा काटेखाये, मनिषा हातेल, कुसुम दिघोरे, सुनंदा लोहकर, रमेश लेंडे, हुसन जिभकाटे, विश्वनाथ गिरडकर, मनोज वैरागडे, देवनाथ वैद्ये, लोपमुद्रा वैरागडे, सेवक काटेखाये, प्रेमलाल अहिर, शामलता अहिर, रमा काटेखाये व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे शिकवणीवर मार्गदर्शन करून प्रगट दिनाचे उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन भाऊराव लांजेवार व आभार धनराज दिघोरे यांनी केले. (वार्ताहर)