महामानवाच्या जयंतीनिमित्त जागृती सप्ताहाचे आयोजन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:27 IST2021-04-06T04:27:50+5:302021-04-06T04:27:50+5:30
गोंदिया : सर्वसमाज विचार महोत्सव समिती, संविधान मैत्री संघ आणि समता सैनिक दलाच्या संयुक्तवतीने सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा ...

महामानवाच्या जयंतीनिमित्त जागृती सप्ताहाचे आयोजन ()
गोंदिया : सर्वसमाज विचार महोत्सव समिती, संविधान मैत्री संघ आणि समता सैनिक दलाच्या संयुक्तवतीने सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल पर्यंत जागृती सप्ताह घर घर जयंती उपक्रम राबविला जात आहे. यात, विविध कला, साहित्य व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत, ८ एप्रिल रोजी सम्राट अशोक यांच्या जीवन संघर्षावर आधारित ‘बोध कथाकथन स्पर्धा’ आणि ‘प्रश्नोत्तरी’, ९ एप्रिल रोजी ‘कविता वाचन’ स्पर्धा आणि सम्राट अशोक कालीन बौद्ध संस्कृती, हस्तकलेचे वास्तू स्तूप स्मारक या त्यांच्या आयुष्याशी संबंधित दुर्मीळ छायचित्र संग्रह प्रदर्शन, १० एप्रिल रोजी महामानवांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपले कर्तव्य यावर वक्तृत्व कला प्रदर्शन आणि महात्मा फुले यांचा जीवन संघर्ष यांच्या जीवन संघर्षावर आधारित प्रश्नोत्तरी, ११ एप्रिल रोजी देशभक्तीपर, फुले सावित्री भीम बुद्ध महामानव यांचे गीत गायन तसेच महात्मा फुले यांच्या आयुष्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्र संग्रह प्रदर्शन, १२ एप्रिल रोजी महामानवाचे कार्य, संविधान जागृती अशा विविध विषयांवर चित्रकला स्पर्धा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित प्रश्नोत्तरी, १३ एप्रिल रोजी महामानवाच्या जयंती उत्सवात उदो-उदो जयजयकार केल्याने समतावादी समाज निर्माण करणे शक्य किंवा अशक्य या विषयावर निबंध स्पर्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह प्रदर्शन तर १४ एप्रिल रोजी रांगोळी दीप सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात स्पर्धकांनी घरासमोर रांगोळी आणि दीप सजावट करुन आणि महामानवाचे अभिवादन करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर कुटुंबासमवेत फोटो पाठवायचे आहे. वरील स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही गटांसाठी आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धांचे पुरस्कार प्रदान केले जातील. अधिक माहितीसाठी संविधान मैत्री संघटना संयोजक अतुल सतदेवे यांच्याशी संपर्क साधावा.