अंगात भूत येणे मानसिक आजार- प्रकाश धोेटे

By Admin | Updated: March 20, 2016 02:14 IST2016-03-20T02:14:00+5:302016-03-20T02:14:00+5:30

अंगात भूत, देवी-देवता येणे अशा घटना समाजात घटत असतात. विशेष सण, उत्सव व नवरात्र इत्यादी दरम्यान हे नेहमी बघावयास मिळते.

Awareness mental illness- light wash | अंगात भूत येणे मानसिक आजार- प्रकाश धोेटे

अंगात भूत येणे मानसिक आजार- प्रकाश धोेटे

सालेकसा : अंगात भूत, देवी-देवता येणे अशा घटना समाजात घटत असतात. विशेष सण, उत्सव व नवरात्र इत्यादी दरम्यान हे नेहमी बघावयास मिळते. परंतु अंगात कोणालाही भुत येत नाही, किंवा देवी-देवता सुद्धा येत नाही. ज्याच्या अंगी असे घडून येते तो मानसिक आजाराने ग्रस्त असतो असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश धोटे यांनी केले.
येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, तलाठी व ग्रामसेवकांच्या कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना धोटे यांनी, अंगात भुत येणे, त्याला तंत्रमंत्राने भगविणे व झाडफुकाचे उपचार करणे हा सर्व ढोंगी बुवा व तथाकथीत चमत्कारी बाबांचा समाजघातकी व्यवसाय आहे. ही फक्त एक अंधश्रद्धा असून काही लोक नेहमी समाजात अंधश्रद्धा पसरवून ठेवतात आणि भोळ्या भाबड्या लोकांची लुबाडणूक करीत असतात. करिता चमत्कार व जादूसारख्या गोष्टींवर आपला वेळ आणि पैसा खर्च करु नये. जो या गोष्टींमध्ये राहिला तो आपल्या कुटूंबाला उध्वस्त करुन बसला असल्याचे सांगीतले.
तसेच काही लोक समजतात की माणूस मेल्यावर त्याचा आत्मा भटकतो आणि त्याला जीवंतपणी त्रास देणाऱ्याला सतावत असतो. जर असे झाले असले तर लोक रोज कोंबळे, बकरे इत्यादी जीवांची हत्या करुन भक्षण करीत असतात. त्यांची आत्मा आपला सूड घेतल्याशिवाय राहिली नसती. लिंबूतून रक्त काढणे, नारळातून वित्रिच वस्तू बाहेर काढणे, पाण्याचे दिवे जाळणे इत्याची चमत्कार दाखविणारे ढोंगी बाबा आपल्या हात चलाखिने लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्नात यशस्वी होतात आणि लोकभ्रमीत होऊन त्यांच्या भ्रमजाळात अडकून बसतात. या संधीचा गैरफायदा घेत ढोंगी बाबा लोकांची आर्थिक, शारिरीक पिळवणूक करीत असतात. एवढेच नाही तर मुल होत नसलेल्या महिलेची फसणवूक करुन तिच्यावर शारीरिक अत्याचार सुद्धा करित असतात. म्हणून महिलांनी अशा ढोंगी बाबापासून नेहमी सावध राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मार्गदर्शन प्रसंगी सभापती हिरालाल फाफनवाडे, उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, बीङीओ यशवंत मोटघरे, विस्तार अधिकारी यु.टी. राठोड, विजय मानकर, गणेश भदाडे, विस्तार अधिकारी उके व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रेला, मधु हरिणखेडे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Awareness mental illness- light wash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.