सालेकसा येथे महिला विद्यार्थ्यांसाठी जागृती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST2021-09-23T04:32:16+5:302021-09-23T04:32:16+5:30

सालेकसा : आम्ही सिद्ध लेखिका व संविधान मैत्री संघ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लेखन कलागुण प्रोत्साहनपर विविध स्पर्धा व उच्चविद्याविभूषित ...

Awareness activities for female students at Saleksa | सालेकसा येथे महिला विद्यार्थ्यांसाठी जागृती उपक्रम

सालेकसा येथे महिला विद्यार्थ्यांसाठी जागृती उपक्रम

सालेकसा : आम्ही सिद्ध लेखिका व संविधान मैत्री संघ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लेखन कलागुण प्रोत्साहनपर विविध स्पर्धा व उच्चविद्याविभूषित मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह सालेकसा येथे आयोजित केला आहे.

या जागृती कार्यक्रमांतर्गत लेखन प्रोत्साहनपर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरण, महिलांचे संविधानानुसार घटनादत्त अधिकार, महिलांनी स्वत:ची सुरक्षा कशी करावी, तुम्हाला पत्रकार व्हावे वाटते काय? वरील तीनही विषयांमधून एका विषयावर आपले मत मांडणे आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय सोबत भाग घेणाऱ्या सर्वच प्रतिभागी स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात येईल आणि उच्चविद्याविभूषित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येईल. यावेळी प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम, आम्ही सिद्ध लेखिका नागपूरच्या प्रा. विजया मारोतकर व कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा.डॉ. दिशा गेडाम उपस्थित राहतील.

Web Title: Awareness activities for female students at Saleksa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.