जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांना करणार पुरस्कृत

By Admin | Updated: September 13, 2015 01:42 IST2015-09-13T01:42:28+5:302015-09-13T01:42:28+5:30

गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना विदर्भ प्रदेश विकास परिषद व गौरक्षा सेवा समितीच्यावतीने पुरस्कृत केले जाणार आहे.

Awarded to Ganesh Mandals who have made public awareness | जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांना करणार पुरस्कृत

जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांना करणार पुरस्कृत

गोंदिया : गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना विदर्भ प्रदेश विकास परिषद व गौरक्षा सेवा समितीच्यावतीने पुरस्कृत केले जाणार आहे.
देशात आज कुष्ठरोग निर्मुलन, पर्यावरण संतुलन, वन्यजीव संरक्षण, बेटी बचाओ-बेटी पढाओ, रक्तदान, सामाजीक एकता, सर्वधर्म समभाव आदि विषय गंभीर रूप धारण करून आहेत. या विषयांवर जनजागृतीतूनच तोडगा काढता येणार आहे व यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. मात्र दहा दिवसीय गणेशोत्सव व उत्सव साजरा करणारे मंडळ सुद्धा एक जनजागृतीचे माध्यम बनून समाजातील नागरिकांत या विषयांबाबत जनजागृती करून शकतात. यामुळेच विदर्भ प्रदेश विकास परिषद व गौरक्षा सेवा समिती जनजागृतीचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील प्रथम तीन गणेश मंडळांना पुरस्कृत करणार आहे.
यात प्रथम पुरस्कार ११ हजार रूपये, द्वितीय पुरस्कार सात हजार रूपये व तृतीय पुरस्कार पाच हजार रूपये, सन्मानपत्र व ट्रॉफी तसेच आठ मंडळांना प्रोत्साहन पुरस्कार म्हणून तीन हजार रूपये, सन्मानपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विदर्भ विकास परिषदेचे जिल्हा संयोजक कृष्णा राठोर यांच्या संपर्क साधता येईल. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Awarded to Ganesh Mandals who have made public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.