शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

अवैध दारू व अंमली पदार्थ विक्रीवर आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

किशोरवयीन मुले देखील याच्या आहारी जाऊन याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. तेव्हा या सर्व बाबींवर त्वरीत नियंत्रण आणून अवैध व्यवसायांवर आळा घालावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे. तसे निवेदनही सोमवारी (दि.११) भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाजपा शिष्टमंडळाची मागणी : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात विशेषत: शहरात अवैध व्यवसाय व अवैध मद्यविक्र ीला ऊत आले असून शहरात गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. यापासून किशोरवयीन मुले देखील याच्या आहारी जाऊन याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. तेव्हा या सर्व बाबींवर त्वरीत नियंत्रण आणून अवैध व्यवसायांवर आळा घालावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे. तसे निवेदनही सोमवारी (दि.११) भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांना देण्यात आले आहे.भाजपाच्या शिष्टमंडळाने शहर पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी पांडे व ठाणेदार बबन आव्हाड यांची भेट घेऊन शहरातील समस्यांवर सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात, गौ-हत्या व गौ-मांस विक्रीवर प्रतिबंध असूनही त्याची सर्रासपणे शहरात विक्री केली जात असून यावर आळा घालावा, अवैध कॅसिनो व व्हिडीओ गेम पार्लर आदी धंदे त्वरीत बंद करण्यात यावेत, अल्पवयीनांना बियरबार, बियर शॉपी, वाईनशॉप अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध असून संबंधित व्यवसायिकांना तशी ताकीदही शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र कायदा बाजूला ठेवत राजरोसपणे हा सर्व प्रकार घडत असतो तेव्हा यावर रोक लावण्यात यावी, गांजा, अफिम, कोकिन, ब्राऊन शूगर सारख्या प्रतिबंधीत अंमली पदार्थांची विक्री थांबवावी, पानठेले, टपरी, हातगाड्या, हॉटेल व्यवसायी व इतर व्यवसायिकांना निर्धारित वेळेत आपली प्रतिष्ठाने बंद करण्याची ताकीद द्यावी, शहर व परिसरातील अवैध नकली व हातभट्टीची दारू तर खुलेआम सुरू असलेल्या सट्टा व्यवसायाला बंद करण्यात यावे, शहरातील स्टेडीयम, रिंगरोड व अनेक सार्वजनिक ठिकाणी सायंकाळनंतर खुले बार सुरू झाल्याचे दिसत असून रिंग रोड परिसरात युवक-युवतींचे अश्लिल चाळे होतानाही दिसून येतात तेव्हा या भागात पोलीस गस्त वाढवावी व शहरातील टपऱ्यांवर लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.सदर मागण्यांवर २५ नोंव्हेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संजय कुळकर्णी, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, देवेश मिश्रा, जयंत शुक्ला, अशोक चौधरी, किशोर हालानी, मनोहर आसवानी, दिलीप गोपलानी, हेमलता पतेह, क्रांती जायसवाल, पराग अग्रवाल, शंभूशरणसिंह ठाकूर, राकेश ठाकूर, अशोक पाठक, अमीत झा, गोल्डी गावंडे, संजय मुरकूटे, अभय सावंत, रोशन जायसवाल, अशोक जियसंघानी, चंद्रभान तरोने, धर्मेंद्र डोहरे, बाबा बिसेन, महेश चौरे, निरज ठाकूर, ऋतूराज मिश्रा, हरीराम आसवानी, राजेश चौरिसया, भरत भादूपोते, संदिप श्रीवास, बंटी शर्मा, गौरव धोटे, अनूपम ठाकूर, प्रशांत कोरे, अर्पीत पांडे, सचिन बरबटे, निखिल मुरकुटे, मंगलेश गिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक