२९९ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:21+5:30

जिल्हयात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे सर्वांनाच धडकी रली होती. परिणामी शेतीची कामेही लांबल्या गेली. सुरूवातीचे २ महिने दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्हावासीयांना खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यात बरसलेल्या पावसाने सन २००५ मधील पुरालाही मागे टाकले होते.

Average rainfall of 299 mm is expected | २९९ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित

२९९ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देपुरानंतरही पावसाची तूट कायम । ३ तालुक्यांवर वरूणदेव प्रसन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २००५ मध्ये आलेल्या पुराला मागे सोडणाऱ्या पुराने यंदा जिल्ह्यात कहर केला. असे असतानाही मात्र शासकीय आकडेवारीनुसार अपेक्षेच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असून तूट कायम आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत पावसाची नोंद घेतली असून त्यानुसार, ४३८०७.४६ मीमी म्हणजेच सरासरी १३२७.४९ एवढा पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे आता उरलेल्या १० दिवसांत आणखी १००८८.४९ मीमी म्हणजेच सरासरी २९९.७ एवढा पाऊस अपेक्षित आहे. अन्यथा यंदाही जिल्ह्यात पावसाची तूट कायम राहणार.
जिल्हयात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे सर्वांनाच धडकी रली होती. परिणामी शेतीची कामेही लांबल्या गेली. सुरूवातीचे २ महिने दडी मारून बसलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्हावासीयांना खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यात बरसलेल्या पावसाने सन २००५ मधील पुरालाही मागे टाकले होते.
ऑगस्ट महिन्यातील पावसाने चांगलाच कहर केला होता. असे असतानाही जिल्ह्यात शुक्रवारपर्यंतची (दि.१८) शासकीय आकडेवारी बघता ३३७१८.९७ मीमी पाऊस बरसला असून त्याची १०२१.७९ एवढी सरासरी आहे. तर जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत पाऊस नोंद केला जात असून शासकीय आकडेवारीनुसार ४३८०७.४६ मीमी पाऊस अपेक्षित असून त्याची १३२७.४९ एवढी सरासरी आहे.
म्हणजेच, जिल्ह्यात आता उरलेल्या १० दिवसांत आणखी १००८८.४९ मीमी. पाऊस अपेक्षित असून त्याची २९९.७ एवढी सरासरी आहे. एकंदर जिल्ह्यात पूर येत पर्यंत पाऊस बरसला असतानाही सुरूवातीपासून पाऊस न बरसल्याने पडलेली तूट या पुरात बरसलेल्या पावसामुळेही भरून निघाली नसल्याचे दिसते.
यामुळेच अद्याप २९९.७ एवढ्या सरासरी पावसाची तूट कायम आहे. आता १० दिवसांत पाऊस आल्यास व एवढी तूट भरून निघाल्यास शासकीय आकडेवारीनुसार पाऊस तंतोतंत पडल्याचे म्हणता येईल.

गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुका लबालब
जिल्ह्यात पावसाची तूट कायम असतानाच मात्र गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यावर मात्र पाऊस मेहरबान दिसत आहे. या तालुक्यांची आकडेवारी बघितल्यास शुक्रवारपर्यंत गोरेगाव तालुक्यात ३९८९.४६ मिमी (१३२९.८२) पाऊस अपेक्षित असताना ४६२६.२५ मिमी. (१३४२.६८) पाऊस बरसला आहे. तर सडक-अर्जुनी तालुक्यात ३९१३.३२ मिमी (१३०४.४४) पाऊस अपेक्षित असताना ४०८४.५८ (१३६१.५३) एवढा पाऊस बरसला आहे.

Web Title: Average rainfall of 299 mm is expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.