शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

ऑटो टिप्परला लागलेले ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM

याबाबत ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजी ‘कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित करून हा प्रकार पुढे आणला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषदेने त्याचदिवशी निविदा उघडली. मात्र काही तांत्रीक अडचण आल्याने १९ तारखेला दरपत्रक उघडण्यात आले.

ठळक मुद्देनिविदा उघडूनही कार्यादेश नाही : आदर्श आचारसंहितेचा अडसर, वाहनांची होत आहे दुरवस्था

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निविदा उघडण्यात झालेले दुर्लक्ष व त्यानंतर आता निविदा उघडण्यात आली असताना कार्यादेश देता येणार नसल्याने नगर परिषदेला मिळालेल्या ३३ ऑटो टिप्पर मागे लागलेले ग्रहण काही सुटणार नाही. परिणामी आणखी किमान दोन महिने तरी ऑटो टिप्पर नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात धूळ व पाणी खात पडून राहणार यात शंका नाही.शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संकलित करता यावा, यासाठी नगर परिषदेला शासनाकडून ३३ ऑटो टिप्पर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, नगर परिषदेने कोट्यवधी रूपये खर्चून हे ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले. ते जुलै महिन्यात नगर परिषदेत आले. मात्र ते ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेकडे मनुष्यबळ नसल्याने नगर परिषदेने ऑटो टिप्परसाठी १० जुलै रोजी ३३ चालक व ३३ हमालांसाठी निविदा टाकली. मात्र या निविदेकडे दुर्लक्ष झाल्याने ३३ ऑटो टिप्पर आता नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात धूळ व पाणी खात पडून आहेत.याबाबत ‘लोकमत’ने १८ सप्टेंबर रोजी ‘कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित करून हा प्रकार पुढे आणला होता. या बातमीची दखल घेत नगर परिषदेने त्याचदिवशी निविदा उघडली. मात्र काही तांत्रीक अडचण आल्याने १९ तारखेला दरपत्रक उघडण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये खडकी (पूणे) येथील एका एजंसीने निविदा रकमेच्या २ टक्के दर कमी टाकल्याने त्यांना हे काम देता येते. मात्र नियमानुसार, संबंधिताला आठ दिवसांच्या आत निविदा रकमेच्या १ टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावयाची आहे. अशात आता आणखी दोन दिवस उरत आहे. एकंदर निविदेची प्रक्रिया झाली आहे. मात्र दोन महिने अडकवून ठेवलेल्या या निविदेचा आता काहीच फायदा होणार नाही. कारण निविदा प्रक्रिया झाली असली तरीही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संबंधिताला कार्यादेश येत नाही.यामुळे आता पुढील दोन महिने तरी आचारसंहितेमुळे ऑटो टिप्पर शहरातील रस्त्यांवर धाऊ शकणार नाही. म्हणजेच, कोट्यवधी रूपयांचे हे ऑटो टिप्पर ज्याप्रकारे नगर परिषद कार्यालय परिसरात धूळ व पाणी खात पडून आहेत त्याच स्थितीत राहणार यात शंका नाही. स्वच्छतेच्या विषयाला घेऊन शासन गंभीर असून पैशांची पर्वा न करता नगर परिषदेला सर्व साहित्य पुरवून देत आहे. मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे या चालक व हमाल पुरवठ्याची निविदा अडकून पडली. परिणामी कोट्यवधींचे हे ऑटो टिप्पर सडत पडले आहेत.जुलैपासून सुरू आहे निविदा प्रक्रियाप्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेने चालक व हमाल पुरवठ्यासाठी १० जुलै रोजी निविदा टाकली. १४ ऑगस्ट रोजी ही निविदा उघडण्यात येणार होती. मात्र त्यात काही अडचण आल्याने दोनवेळा शुद्धीपत्रक टाकून तारीख वाढविण्यात आली व त्यानुसार ३० आॅगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र निविदा उघडण्यात आली नाही. यादरम्यान ‘लोकमत’ मध्ये बातमी प्रसिद्ध होणार असल्याने नगर परिषदेने आपली बाजू सावरत १८ सप्टेंबर रोजी निविदा उघडली.यामुळे संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.ऑटो टिप्परचे साहित्य चालले चोरीलानगर परिषदेने खरेदी केलेले हे ३३ ऑटो टिप्पर नगर परिषद कार्यालय परिसरात दोन महिन्यांपासून पडून आहेत. यांच्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ऑटो टिप्पर मधील बॅटरी व अन्य साहित्य चोरीला जात असल्याचीही माहिती आहे.नगर परिषदेकडून याबाबत नकार दिला जात असला तरिही कित्येकांकडून याबाबत सांगीतले जात आहे. शिवाय कित्येक वाहनांच्या चाकातील हवा निघाली असून ते उभे असल्याने पुढील दोन महिन्यांत त्यांचीही दुरूस्ती करावी लागणार व तोपर्यंत या वाहनांतील आणखी किती साहित चोरीला जाते हे बघायचे आहे.निविदेत पाच एजन्सी पात्रचालक व हमाल पुरवठयासाठी नगर परिषदेने काढलेल्या २.९० कोटींच्या या निविदेत ८ एजन्सीकडून निविदा टाकण्यात आली आहे.यात गोंदियातील तीन तर बाहेरील पाच एजन्सी आहेत. मात्र कागदपत्र छाननीत फक्त पाच एजंसी पात्र ठरल्या व त्यातील खडकी (पुणे) येथील एजंसीचे सर्वात कमी दर आहेत. त्यामुळे नियमांची पूर्तता केल्यास या एजंसीला काम देता येईल. शिवाय अन्य पर्याय उपलब्ध न झाल्यास पुन्हा निविदा टाकावी लागणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका