बैठकी बाजार वसुलीसाठी होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 09:38 PM2018-03-18T21:38:28+5:302018-03-18T21:38:28+5:30

नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे.

Auction to be held for meeting market | बैठकी बाजार वसुलीसाठी होणार लिलाव

बैठकी बाजार वसुलीसाठी होणार लिलाव

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपरिषदेचा प्रयोग : पर्यायी व्यवस्थेसाठी धडपड, नगर परिषदेचे उत्पन्न वाढणार

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे. त्यामुळे उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगर परिषद बाजार विभागाने निविदा काढली असून यात आॅनलाईन बोली लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर नवे अध्यक्ष व नव्या सदस्यांच्या नव्या पाळीला सुरूवात झाली. यांतर्गत ७ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांच्या पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ कलम २७२ अंतर्गत बैठकी बाजार वसुली केली जात होती. मात्र बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच रकमेच्या पर्यायी उत्पन्नाची व्यवस्था करणे गरजेचे असून तशी अधिनियमांत नोंद आहे. यामुळे बाजार विभागाने नगराध्यक्षांच्या घोषणेनंतरही १४ फेब्रुवारी पर्यंत बाजार वसुली सुरू ठेवली. मात्र नगराध्यक्षांनी घोषणा केल्याने बाजारात दुकान लावणाऱ्यांकडून वसुली कर्मचाºयांना प्रतिसाद देण्यात आला नाही.
बैठकी बाजार वसुलीतून बाजार विभागाला वार्षीक सुमारे सात लाख रूपयांचे उत्पन्न येत होते. मात्र अचानकच हे उत्पन्न बंद झाल्याने नगर परिषदेची आर्थिक अडचण वाढली होती. शिवाय अधिनियमात नोंद असल्यामुळे तेवढ्याच रकमेची पर्यायी व्यवस्था करणे नगर परिषदेला गरजेचे होते. मात्र बैठकी बाजार वसुली करू नये असा ठराव १६ मार्च २०१७ रोजीच्या विशेष सर्व साधारण सभेतही घेण्यात आला होता. यावर बाजार विभागाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्टेडियम चौपाटी येथील २१ व खोजा मस्जीद फुटपाथ वरील १३ दुकानांकडून दरमहा एक हजार रूपये वसुली सुरू केली. मात्र यातही दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर बाजार वसुलीच्या या प्ररकरणाला घेऊन व नगर परिषदेची आर्थिक अडचण सोडविता यावी यासाठी नगराध्यक्ष इंगळे यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकाºयांकडे ठराव रद्द करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आता १५ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत बैठकी बाजार वसुलीसाठी कंत्राट देण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी नगर परिषदेच्या बाजार विभागाने १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूकांकडून निविदा मागविली असल्याची माहिती आहे.
आॅनलाईन बोली लागणार
नगर परिषदेच्या बाजार विभागाने बैठकी बाजार वसुली लिलावासाठी १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात किमान बोली ११ लाख रूपयांची ठेवण्यात आली आहे. यासाठी २६ मार्च रोजी आॅनलाईन बोली लावली जाणार असून त्यात ५ हजार रूपयांच्या पटीने बोली वाढविता येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नगर परिषदेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हे येणाºया काळातच दिसेल.

Web Title: Auction to be held for meeting market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.