पहिल्याच दिवशी ५३ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:29+5:302021-02-05T07:48:29+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ...

Attendance of 53% students on the first day itself | पहिल्याच दिवशी ५३ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

पहिल्याच दिवशी ५३ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी कोरोनाला न जुमानता ५२.८५ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. म्हणजेच ५२ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची संमतिपत्र दिले असले तरी पालकांच्या संमतीशिवाय शेकडो विद्यार्थी शाळेत पोहोचले आहेत.

२७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ८२९ शाळा वर्ग ५ ते ८ वीकरिता असून, यापैकी ८२२ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यापैकी ७९४ शाळांमध्ये थर्मल स्कॅनर व इतर आरोग्य विषयक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ८०७ शाळा सुरू झाल्या असून, त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९० शाळा, आमगाव तालुक्यातील ७३ शाळा, देवरी तालुक्यातील ८० शाळा, गोंदिया तालुक्यातील २०६, गोरेगाव तालुक्यातील ८३, सालेकसा तालुक्यातील ७४ शाळा, सडक-अर्जुनी ७४, तिरोडा तालुक्यातील १२३ अशा ८०७ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

वर्ग ५ ते ८पर्यंतची विद्यार्थी संख्या ६७२५१ असून, यापैकी ३५,५४४ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत हजेरी लावली आहे. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५२५५, आमगाव तालुक्यातील ४००८, देवरी तालुक्यातील ३२२८, गोंदिया तालुक्यातील ७०९६, गोरेगाव तालुक्यातील ३८२०, सालेकसा तालुक्यातील २९४५, सडक-अर्जुनी ३११६, तिरोडा तालुक्यातील ६०७६ असे एकूण ३५५४४ विद्यार्थी पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचले.

-------------------------

५२ टक्के पालकांनी दिले संमतिपत्र

वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांकडून संमतिपत्र भरून मागविण्यात आले आहे. यात ५२ टक्के पालकांनी समंतिपत्र दिले आहेत. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६५ टक्के, आमगाव ५८ टक्के, देवरी ५६ टक्के, गोंदिया ४२ टक्के, गोरेगाव ६८ टक्के, सालेकसा ५९ टक्के, सडक-अर्जुनी २० टक्के, तर तिरोडा तालुक्यातील ६२ टक्के शिक्षकांनी संमतिपत्र दिले आहेत.

Web Title: Attendance of 53% students on the first day itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.