सर्व जाती धर्मांना जोडण्याचे प्रयत्न

By Admin | Updated: May 2, 2017 00:29 IST2017-05-02T00:29:34+5:302017-05-02T00:29:34+5:30

सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून प्रत्येक पालक आपल्या कन्येच्या कन्यादानाचे पुण्य कमावित आहे.

Attempts to connect all castes to all castes | सर्व जाती धर्मांना जोडण्याचे प्रयत्न

सर्व जाती धर्मांना जोडण्याचे प्रयत्न

गोपालदास अग्रवाल : कामठा येथे पार पडला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा
गोंदिया : सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून प्रत्येक पालक आपल्या कन्येच्या कन्यादानाचे पुण्य कमावित आहे. त्यांच्या या पुण्यकार्यात मदत करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. यासाठी सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन करीत आहेत. या आयोजनातून सर्व जाती व धर्मांना एक मंचावर आणून जोडण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
कामठा येथे प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टच्या वतीने (दि.२८) अक्षयतृतीयेच्या दिनी आयोजीत सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. या विवाह सोहळ््याला आ.संजय पुराम, उमा अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, डॉ. झामसिंग बघेले, अ‍ॅड. के. आर. शेंडे, खिलेश्वरबाबा खरकाटे, प्रेमसागर गणवीर, जि.प.सभापती पी.जी.कटरे, सरपंच कल्पना खरकाटे, गोपालबाबा खरकाटे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, जि.प.सभापती विमल नागपूरे, रमेश अंबुले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगावच्या पं.स. सभापती हेमलता डोये, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले उपस्थित होते.
आ.अग्रवाल पुढे म्हणाले,या विवाह सोहळ््याच्या माध्यमातून क्षेत्रात एक नवी वैचारीक क्रांती आणण्याचे आमचे प्रयत्न आहे. जोपर्यंत समाजातील प्रत्येक श्रीमंत-गरीब व्यक्ती सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून विवाह करण्याची परंपरा सुरू करीत नाही तोवर हे प्रयत्न सुरूच राहणार आहे. आ.पुराम यांनी, राजकारणासोबतच सामाजीक कार्यात हा सामूहिक विवाह सोहळा महत्वाचा असून सर्व धर्मांना एकाच मंचावर आणण्याची आ.अग्रवाल यांची संकल्पना प्रशंसनीय असल्याचे म्हणाले.
शिवणकर यांनी, या विवाह सोहळ््यातून सर्व धर्मीयांना एक मंच मिळाले असून ते आपूलकीच्या भावनेतून या पुण्य कार्यात सहभागी होत असल्याचे मत व्यक्त केले. जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, विवाह सोहळ््यांती फिजूलखर्ची रोखण्यासाठी हे आयोजन महत्वाचे असल्याचे मत जिल्हाधिकारी काळे यांनी व्यक्त केले. आ. अग्रवाल यांनी क्षेत्रात विकासकामे आणून विकासाचे राजकारण केले आहे. सोबतच विवाह सोहळ््याच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येत जोडप्यांना परियणसुत्रात बांधण्यात आले, असे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ म्हणाले. प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी टिकाराम भाजीपाले, बाजार समिती संचालक सावलराम महारवाडे, देवेंद्र अग्रवाल, हुकूमचंद नागपूरे, संतोष घरसेले, संजय अग्रवाल, मुन्ना खरकाटे, लक्ष्मण तावाडे, मिर्ज जमील बेग, रमन लिल्हारे, दिनेश अग्रवाल, झुन्नू खरकाटे, दीपक मालगुजार, आलोक मोहंती, कैलाश अग्रवाल, भूवन सोलंकी, मोनू खरकाटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

६५ जोडप्यांचे शुभमंगल
कामठा येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ््यात विविध जाती धर्मातील ६५ जोडप्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ‘शुभमंगल’ करण्यात आले. यात बौद्ध समाजातील जोडपींचा विवाह भंते बुद्धकिर्ती यांनी लावला. तर हिंदू धर्मातील जोडप्यांसाठी चुटे यांनी मंगलाष्टके गायीली. या जोडप्यांना आ. अग्रवाल यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, ाांड्यांचे सेट, टेबल पंखा व सुटकेस भेट देण्यात आली. ट्रस्टकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. सोलापूरच्या चमूने लावणी सादर केली.

Web Title: Attempts to connect all castes to all castes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.