चाकूने मारून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:22+5:302021-02-09T04:32:22+5:30
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डातील निखील त्रिलोकचंद ठवरे (३०) या तरुणाला नंगपुरा येथील तरुणाने चाकून ...

चाकूने मारून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डातील निखील त्रिलोकचंद ठवरे (३०) या तरुणाला नंगपुरा येथील तरुणाने चाकून मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राकेश खोब्रागडे (३०) याने निखिल त्रिलोकचंद ठवरे (३०) याच्या पोटावर चाकूने मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता निखिल ठवरे मुर्री चौकीजवळील येरणे बार जवळ उभा असताना त्याच्याजवळ आलेल्या राकेशने त्याच्यासोबत वाद घालून चाकून पोटावर सपासप वार केले. त्याचा खून करण्याचा त्याचा मानस होता. निखिलला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात आरोपीवर ८ फेब्रुवारी रोजी गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.