मोबाईलचे आमिष देत अल्पवयीन युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न
By Admin | Updated: April 30, 2017 00:50 IST2017-04-30T00:50:53+5:302017-04-30T00:50:53+5:30
आमगाव तालुक्याच्या कट्टीपार येथील राहुल घनश्याम बोहरे (२२) याने गावातीलच १७ वर्षाच्या मुलीला मोबाईलचे आमिष देऊन शरीरसुखाची मागणी केली.

मोबाईलचे आमिष देत अल्पवयीन युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न
गोंदिया : आमगाव तालुक्याच्या कट्टीपार येथील राहुल घनश्याम बोहरे (२२) याने गावातीलच १७ वर्षाच्या मुलीला मोबाईलचे आमिष देऊन शरीरसुखाची मागणी केली. तिला कालव्याच्या खाली ओढून नेत असताना तिचा भाऊ त्या ठिकाणी आल्याने दोघांचा वाद झाला. यात मुलीच्या भावाला मारहाण केली. ही घटना बुधवारच्या दुपारी ४ वाजता घडली. अत्याचारा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३५४ (अ) (१), ३२३, ५०४ सहकलम १२ बाल लैगिक अत्याचा अधिनियम, सहकलम ३,१,डब्ल्यूआय, ३,२, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
भाऊजीकडे आलेल्या साळीचा विनयभंग
गोंदिया : आमगावच्या श्रावणटोली येथील १९ वर्षाची तरुणी खमारी येथील आपल्या भाऊजीकडे आली. परंतु खमारी येथील मजनूने तिचा पाठलाग करून तिला इशारे करून घराबाहेर बोलावले व तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारच्या सकाळी ९ वाजता घडली. आरोपी संतोष ब्रिजलाल कुसराम (३९) रा. माल्ही श्रावणटोली याच्याविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टीबीटोली येथील दत्त मंदिराजवळील संजय सदाशिव चामट (३७) याने पत्नीला माहेरून ५० हजार रुपये व आॅटरिक्षा आण म्हणून तिचा १८ फेब्रुवारीपासून छळ केला. मंजू संजय चामट (३५) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४९८ अ, ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)