सात दिवसांपासून एटीएम बंद
By Admin | Updated: May 5, 2017 01:38 IST2017-05-05T01:38:59+5:302017-05-05T01:38:59+5:30
बँकांनी नागरिकांना एटीएमचा चस्का लावून दिला. एटीएममुळे पैसे काढण्यात नागरिकांना सुविधा होऊ लागली.

सात दिवसांपासून एटीएम बंद
नागरिकांची पायपीट : पैशांसाठी ताटकळत राहण्याची पाळी
ुुबाराभाटी : बँकांनी नागरिकांना एटीएमचा चस्का लावून दिला. एटीएममुळे पैसे काढण्यात नागरिकांना सुविधा होऊ लागली. मात्र आता एटी
एम सेवा बंद पडून राहत असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी त्रास होत आहे.
ग्रामीण भागासोबतच शहरात सुध्दा पैसे काढण्याचे व्यवहार एटीएमद्वारे होत आहे. अर्जुनी-मोरगाव येथे चार एटीएम मशीन आहेत. भारतीय स्टेट बँकेचे एटीएम खराब झाले आहे. बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे राहत नाही. देना बँकेचा एटीएम एक महिन्यापासून कुलूप लागले आहे. तर को-आॅपरेटीव्ह बँकेचे एटीएम बंद पडून आहे. अशा कारभारामुळे शेतकरी व सामान्य लोकांची आठवड्यापासून पायपीट सुरु आहे. मात्र यातून कोणताच उपाय दिसत नाही.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून पैशांसाठी कामे अडून जातात. शिवाय दैनंदिन जिवनातील इतर कामे करण्यासाठी पैशांची गरज पडते. त्यात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने विड्रॉल करण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी आहे. त्यात एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली असून बँकांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिक बँक व एटीएम समोर बसून आपल्या व्यथा कुणाला सांगावे असा प्रश्न करीत आहेत. त्वरीत एटीएम सुरू करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत. (वार्ताहर)