सौंदड येथील एटीएम जाळले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:39+5:302021-03-18T04:28:39+5:30
गोंदिया : एटीएम असलेल्या खोलीची मागची भिंत फोडून एटीएमला गॅस कटरने कापून आग लावल्याने त्यामध्ये असलेले ८३ हजार रुपये ...

सौंदड येथील एटीएम जाळले ()
गोंदिया : एटीएम असलेल्या खोलीची मागची भिंत फोडून एटीएमला गॅस कटरने कापून आग लावल्याने त्यामध्ये असलेले ८३ हजार रुपये जळून खाक झाले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम सौंदड येथे १६ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजतादरम्यान ही घटना घडली.
ग्राम सौंदड येथे फिर्यादी जगदीश उदाराम नेवारे (३४, रा. पळसगाव-राका) यांनी एटीएम लावले आहे. त्यामध्ये तीन लाख ६६ हजार ५०० रुपये टाकले होते. त्यातील दोन लाख ८३ हजार ५०० रुपये ग्राहकांनी काढले होते व ८३ हजार रुपये शिल्लक होते. अशात अज्ञात आरोपीने १६ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजतादरम्यान एटीएम मशीनच्या मागील भिंत तोडून आत प्रवेश केला. त्याने सीसीटीव्ही कॅमेरे तोडून गॅस कटरने मशीन कापून आग लावून दिली. यामध्ये मशीनमध्ये असलेले ८३ हजार रुपयेही जळून खाक झाले. डुग्गीपार पोलिसांनी नेवारे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४६१, ५११, ४२७ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.